Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

5 वस्तू ज्या तुम्हाला स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील

5 वस्तू ज्या तुम्हाला स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यास मदत करतील
, सोमवार, 27 जून 2016 (16:29 IST)
आपल्या किचनला स्वच्छ ठेवण्याचे काही नियम आहे ज्याचे पालन आपण नेहमी करायला पाहिजे. जेवण झाल्यानंतर किचन स्वच्छ करणे फारच जरूरी आहे. सीलनं आणि अनुपयोगी वस्तूंना हटवणे फारच गरजेचे आहे. 
 
दुसरीकडे, किचनची स्लॅब, गॅस स्टोव्ह , मायक्रोवेव आणि इतर वस्तूंचे वापर आम्ही रोजच करतो मग त्यांना स्वच्छ करणे देखील आमची जबाबदारी आहे. तर मग आम्ही तुम्हाला सांगत आहोत किचनला पूर्णपणे स्वच्छ करण्याची काही पद्धत आणि महत्त्वपूर्ण वस्तू जे तुमच्या किचनला 24 तास स्वच्छ ठेवू शकतात :
 
किचनची स्लॅब स्वच्छ करणे : तुम्ही स्वयंपाक तयार केल्यानंतर आपल्या किचनची पट्टी स्वच्छ करायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक मऊ कापड आणि लिंबाच्या रसासारखे घरगुती डेटर्जेंटची आवश्यकता असते ज्याने पट्टीचा वास जाईल आणि डागही दूर होतील.  
 
गॅस स्टोव्हला स्वच्छ करणे : गॅस स्टोव्हला देखील रोज स्वच्छ करायला पाहिजे. जर स्वयंपाक करताना गॅसवर काही पडले असेल तर त्याला लगेचच स्वच्छ करायला पाहिजे.  
 
मायक्रोवेवला स्वच्छ करणे : वापर झाल्याबरोबरच मायक्रोवेवला स्वच्छ करणे देखील गरजेचे आहे. याने मायक्रोवेवमध्ये अन्नाचा वास राहणार नाही आणि तेलाचे डागही दूर होतील. मायक्रोवेवला स्वच्‍छ करण्यासाठी एक मऊ कापड्यावर बेकिंग सोडा आणि मीठ घालून स्वच्छ करावे.  
 
सिंकला स्वच्छ करणे : सिंकमध्ये डिश स्वच्छ केल्यानंतर थोडेसे मीठ टाकून द्या. मिठावर सिरका (लिंबाचा सत्त्व)ही टाका आणि एका ब्रशाने सिंकची सफाई करा. सिरक्यामुळे कणकेचा वास चालला जाईल आणि मिठाचे डागही दूर होतील.  
 
भांडे स्वच्छ करणे : सिंकमध्ये पूर्ण रात्रभर भांडे ठेवू नका, कारण यामुळे प्लेट खराब होतात. काम झाल्याबरोबर त्यांना धुऊन घ्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काकडीची भाजी