Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रव्यामधील किडे स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

rva
, मंगळवार, 9 एप्रिल 2024 (20:00 IST)
आपल्या स्वयंपाकघरात अनेक असे साहित्य असतात ज्यांना चांगल्या प्रकारे स्टोर केले नाही तर ते लवकर खराब होतात. तसेच काही खाण्याच्या वस्तूंमध्ये लवकर किडे लागून जातात. रवा देखील अधिक वेळ ठेवला तर त्यात किडे होतात. पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या किड्यांमुळे रवा खाण्यायोग्य राहत नाही. रवा मोकळा ठेवणे किंवा पाण्याच्या संपर्कात आल्यास तो लवकर खराब होतो. रव्यामध्ये लागलेले किडे स्वच्छ करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा. 
 
कडुलिंबाचे पाने रवा मध्ये ठेवावे- 
रवा तुम्ही एयरटाइट कंटेनर मध्ये ठेवतात तरी देखील त्याला किडे लागतात तर अश्यावेळेस रव्यामध्ये कडुलिंबाचे पाने टाकावी. कडुलिंबाची 10 ते 12  पाने स्वच्छ करून रवामध्ये ठेवावी. लक्षात ठेवाल की, कडुलिंबाचे पाने कोरडी असावी. अर्ध्या तासात कडुलिंबाचे पानांमुळे किडे निघून जातील. मग तुम्ही चाळणीने चाळून रवा वापरू शकतात. 
 
कापूरचा उपयोग करावा- 
कापूर अनेक प्रकारचे किडे नष्ट करायला मदत करतो. रव्यामध्ये लागलेले किडे निघून जाण्याकरिता एका पातेलीत रवा घ्या त्यावर एक पेपर टाका, आणि कापूरच्या तीन ते चार वड्या त्या पेपरवर टाका. अर्ध्या तासामध्ये कापूरच्या वासाने किडे निघून जातील. मग चाळणीने रवा चाळून तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात. 
 
रवा उन्हात ठेवावा- 
जर रव्यामध्ये पांढरे किडे लागले असतील तर रवा हा उन्हामध्ये ठेवावा. उन्हाच्या उष्णतेमुळे किडे रव्यामधून बाहेर पडतील. मग चाळणीच्या मदतीने रवा चाळून घ्या. ज्या डब्यामध्ये तुम्ही रवा ठेवत आहेत त्याचे झाकण घट्ट असावे. रवा हा काचेपासून बनलेल्या एयर टाइट जार मध्ये किंवा कंटेनर मध्ये ठेवावा.  

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कापलेले टरबूज ठेवत असाल फ्रिजमध्ये, तर तयार होते विष