बरेच लोक घराच्या स्वच्छतेची खूप काळजी घेतात. घराला नीट नेटकं ठेवणं काही लोकांना आवडत . परंतु बऱ्याच वेळा किचन ची टाईल्स चिकट असते. जर किचन ची टाईल्स घाण आहे तर हे आपल्या घराचे सौंदर्य बिघडवू शकते. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत,चला तर मग जाणून घेऊ या.
* ब्लिचचा घोळ तयार करा.हे वापरण्यापूर्वी हातात ग्लव्स घालावे. या घोळाने किचनची टाईल्स स्वच्छ करा.
* व्हिनेगरच्या घोळाने टाईल्स स्वच्छ करा.
* आपण व्हिनेगर,मीठ आणि बेकिंग सोडा मिसळून घोळ तयार करा. या घोळाने किचनची टाईल्स स्वच्छ करा. असं केल्याने किचनची टाईल्स चमकून निघेल.
* पाण्यात डिटर्जंट मिसळून डाग स्वच्छ केल्याने आपल्याला चांगले परिणाम मिळतील. या मुळे टाईल्स देखील चमकेल. या घोळाने ब्रशच्या साहाय्याने आपण किचनची टाईल्स स्वच्छ करा.