Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाकघरात कामी येणाऱ्या काही सोप्या कुकिंग टिप्स

स्वयंपाकघरात कामी येणाऱ्या काही सोप्या कुकिंग टिप्स
, गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:50 IST)
* आलं लसूण पेस्ट बनविण्यासाठी त्यामध्ये 3: 2 चा अनुपात असावा. कारण आल्याची चव तीक्ष्ण आणि तिखट असते. जास्त आलं टाकल्याने लसणाची चव कळणारच नाही. 
 
* ग्रेव्ही ची भाजी करताना त्यामध्ये बीटरूट आणि गाजराची प्युरी घालू शकता. या भाज्या देखील आधी शिजवून घ्या. बीटरूट आणि गाजराची प्युरी घातल्याने भाजीचा रंग चांगला दिसतो. 
 
* तांदुळाची खीर बनवताना खीर दाट करण्यासाठी त्यामध्ये मक्याचे पीठ पाण्यात घोळून मिसळा. मंद आचेवर खीर दाट होई पर्यंत शिजवा.
 
* बऱ्याच दिवसा पासून फ्रिजमध्ये ठेवलेलं पनीर कडक झाले असल्यास त्याला मीठ घातलेल्या कोमट पाण्यात 15 मिनिटे बुडवून ठेवा. पनीर मऊ होईल.
 
* खमंग पुऱ्या बनविण्यासाठी गव्हाच्या पिठात 1 लहान चमचा तांदळाचे पीठ किंवा रवा घालून कणिक मळून घ्या. पुऱ्या खुसखुशीत बनतात. 
 
* कांदा परतायला वेळा लागतो जर आपल्याकडे जास्त वेळ नाही, तर तेल गरम करताना त्यामध्ये चिमूटभर साखर घाला आणि कांदा परतून घ्या. कांदा लवकर परतेल आणि रंग देखील चांगला येईल. 
 
*  भजींची किंवा पकोड्यांची चव वाढविण्यासाठी हरभराडाळीच्या पिठात थोडं दूध आणि पाणी मिसळून फेणून घ्या.  नंतर त्यामध्ये मीठ आणि हळद मिसळून पुन्हा फेणून घ्या. 
 
* कुकर मध्ये भात किंवा तांदूळ शिजवताना पाण्याचे योग्य प्रमाण नसल्याने भात मऊ बनतो. भात मोकळा हवा असल्यास भात करताना त्यामध्ये 2 चमचे तूप,आणि अर्धा लिंबाचा रस घालून 2 शिट्या देऊन शिजवा. 
 
* चहा किंवा कॉफी करताना साखरेचे प्रमाण जास्त झाले असल्यास त्यामध्ये चिमूटभर मीठ मिसळा. असं केल्यानं साखरेचा गोडपणा कमी होतो.
 
* हिरव्या पाले भाज्या बनवताना त्यांचा रंग फिकट होतो रंग टिकवून ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या करताना त्यामध्ये 2 चमचे दूध मिसळा. दुधाच्या ऐवजी अर्धा चमचा साखर घालू शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

-उगवताना आणि मावळताना सूर्य मोठा का दिसतो असं का?