Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खजुराचा गुळ कसा तयार करतात ?

dates
, गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (11:18 IST)
गूळ हा उसापासून बनतो पण तो खजुरापासूनही बनतो, जाणून घ्या कसा तयार करतात-
खजुराचा गूळ बनवण्यासाठी खजुराच्या झाडाच्या देठापासून रस काढला जातो.
 
खजुराच्या झाडावर वरच्या खोडात V आकारात चाकूने वरची साल सोलून एक कट केला जातो.
 
त्या कापलेल्या भागेतून खूप गोड रस बाहेर पडू लागतो म्हणून तेथे खुंटीवर मडके टांगतात.
 
खजुराच्या झाडातून रस थेंब थेंब टपकतो, जो त्या मातीच्या मडक्यात जमा होतो.
 
भांड्यात गोळा केलेल्या रसाला नीरा म्हणतात. आयुर्वेदानुसार ते प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.
 
आता हा रस एका मोठ्या लोखंडी कढईत टाकून उकळला जातो.
 
जेव्हा रस खूप घट्ट होतो, तेव्हा सुमारे एक- एक किलोग्रॅमच्या गोळ्यात त्याला गोठवतात. त्याचे गुळात रूपांतर होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dark chocolates हृदयासाठी फायदेशीर आहे का ? 5 कारणे जाणून घ्या