Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रव्याला कीड, आळी किंवा जाळी लागू नये यासाठी घरगुती उपाय

रव्याला कीड, आळी किंवा जाळी लागू नये यासाठी घरगुती उपाय
, सोमवार, 19 जुलै 2021 (13:37 IST)
पावसाळा सुरू होताच स्वयंपाकघरात ठेवलेल्या रवा, हरभरा यासारखे पदार्थांमध्ये किडे येऊ लागतात. अशा परिस्थितीत, दरवर्षी पावसाळ्यात आपणही या समस्येमुळे त्रस्त असाल तर तणाव सोडून या उपायांचा अवलंब करा.
 
पावसाळ्यात रव्याला किड्यांपासून वाचवण्यासाठी 

वेलची
पावसाळ्यात रव्याला किड लागू नये म्हणून वेलचीचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम रवा एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. यानंतर एका कागदावर चार ते पाच वेलची चांगल्या प्रकारे गुंडाळून घ्या आणि रवा असलेल्या डब्यात ठेवा आणि ते व्यवस्थित बंद करा. असे केल्याने रवामध्ये जंत होत नाहीत.
 
दालचिनी
दालचिनीच्या मदतीने तुम्ही रवा अळीपासून देखील वाचवू शकता. यासाठी एअर टाईट डब्यात रवा भरल्यानंतर दालचिनीची पावडर किंवा एक ते दोन इंच संपूर्ण दालचिनी कागदात गुंडाळून कंटनेरमध्ये ठेवून व्यवस्थित बंद करा. या उपायाचा प्रयत्न करून रवा एक ते दोन महिन्यांपर्यंत खराब होत नाही.
 
तमालपत्र आणि मोठी वेलची
तमालपत्र आणि मोठी वेलची वापरुन रव्याला किड लागण्यापासून वाचवता येऊ शकतं. यासाठी, आपण तमालपत्र आणि मोठी वेलची कागदात गुंडाळून कंटेनरमध्ये ठेवू शकता. रवा वापरल्यानंतर, कंटेनर टाइट बंद केल्याचे सुनिश्चित करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला तर तुमच्या भावा सारखं बनायचं आहे