कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता ठंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.
पालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.
पकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.
शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
२५.मिठाला पावसाळयात पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो.
पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोड़े लिम्बू पीळावे.
शिळा ब्रेड कड़क उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
रोज विशिष्ट भांड्यात आपण चाहा करतो. त्यास चहाचे डाग पडतात. ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.