Publish Date: Fri, 10 Feb 2017 (12:15 IST)
Updated Date: Fri, 10 Feb 2017 (12:19 IST)
* तांदळात अळ्या होऊ नये यासाठी मीठ मिसळून ठेवा.
* डोसा अथवा इडलीचं पीठ करताना तांदूळ दळतेवेळी मेथीदाणे टाका. यामुळे इडली-डोसा मऊ होईल.
* शिजवताना पालकाचा रंग हिरवा गार रहावा यासाठी चिमूटभर मीठ किंवा साखर मिसळा.
* कणीक मळताना पाण्याबरोबर दूध आणि सायीचा वापर केलातर पोळ्या मऊ आणि स्वादिष्ट होतील.
* तांदूळ शिजवताना एक चमचा तूप, मीठ आणि लिंबाचा रस मिसळावा. यामुळे भात मोकळा सळसळीत आणि पांढरा स्वच्छ होता.
* पनीर पाण्यात ठेवल्यास अधिक काळ ताजं राहतं.