Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Try This:महत्वाच्या किचन टिप्स

Kitchen Tips
, शुक्रवार, 22 जुलै 2022 (22:48 IST)
टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर शिळे होऊन मऊ झाले असल्यास मिठाच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावे, म्हणजे पुन्हा टवटवीत होतील.
 
शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात ठेवून काढावेत. भाजल्यावर खमंग व हलके होतात. 
 
नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकघराची स्वच्छता केल्याने धुळीचे कण शरीरापर्यंत पोहचत नाहीत. 
  
कुकिंग गॅसला सिरका किंवा मीठाच्या पाण्याचे साफ करावे. म्हणजे ते चमकतील आणि तिथे किडेही राहत नाही.
 
मीठदाणीत मीठ नेहमी चिटकत असते. झाकण लावण्याआधी त्यात तीन-चार दाणे तांदुळाचे टाकावे म्हणजे चिटकत नाही. 
 
गोड व तिखट पदार्थ तळताना तेल व तूप समप्रमाणात एकत्र करून तळावेत. त्याने पदार्थ कोरडा होऊन पोटाला त्रास होत नाही.
 
आईस ट्रेमध्ये पाण्यासोबत कॉफी पावडर टाकायला पाहिजे, कारण कोल्ड कॉफीत आईस क्यूब टाकल्याने कॉफी जास्त चवदार लागते.
 
स्वयंपाकघरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्यात दिवा व एग्जॉस्ट फॅन लावायला पाहिजे. त्याने आतील हवा बाहेर जाऊ शकते. 
 
करवंदाला चीक असतो, तो जाण्याकरिता पाण्यात थोडे मीठ घालून त्यात करवंदे बुडवून ठेवावीत. चीक सुटून करवंदे स्वच्छ होतात. 
   
पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. 'स्मार्ट वूमन' फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Weight Loss Tips:रोज रिकाम्या पोटी करा मधाचे सेवन, लठ्ठपणा लोण्यासारखा विरघळेल