Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

फ्रीजमधील वास शोषतो लिंबू

how to get rid from refrigerator smell
डोसा किंवा इडली हलकी होण्यासाठी डाळीबरोबर थोडे पोहे भिजवावेत.
डोसा किंवा इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये म्हणून २/३ हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात.
इडलीचे पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्यावरचा पापुद्रा काढून धुऊन तो या पिठात बुडवून ठेवा. पीठ छान आंबते व इडली चांगली हलकी होते.
 
पकोडे, भजी करताना पिठात कॉर्नफ्लोर टाकावे. तेल कमी वापरले जाते आणि भजी कुरकुरीत होतात. 
कांदा भजी करताना बेसनाच्या पिठात पाव प्रमाणात रवा मिसळावा त्याचप्रमाणे थोडा कोबी घालावा. त्यामुळे भजी कुरकुरीत तर होतातच पण कोबीमुळे जीवनसत्त्वेही मिळतात.
 
लिंबाचे दोन भाग करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. फ्रीजमधील सर्व नकोसे वास शोषले जातात.
कापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिला इसेन्स टाकून फ्रीजमध्ये ठेवावे. फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहतो.
महिन्यातून एकदा थोडे मीठ मिक्सरमध्ये घेऊन बारीक वाटावे. त्यामुळे मिक्सरच्या ब्लेडची धार कायम राहते आणि मीठ पण बारीक मिळते.
 
सायीचे ताक मिक्सरमधून काढल्यास लोणी जास्त निघते व ताक पातळ होते व सायीचा चोथा लागत नाही.
दहीवड्यासाठी दही लावताना दुधात साखर विरघळून विरजण लावावे.
दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमध्ये २ शिट्ट्या करून घ्याव्यात म्हणजे गार झाल्यावर खवा तयार होतो.
तूप कढवून झाले की तुपाच्या भांड्यात पाणी घालून गरम करून गाळून घ्यावे व या पाण्यात भात शिजवावा किंवा आमटीत, कणीक भिजवताना घालावे. तुपाचा वास चांगला येतो. जास्त पाणी उकळून घेऊ नये. बेरीचा आंबटपणा उतरेल.
 
दालचिनी किंवा वेलचीची पूड करता त्यात थोडी साखर टाकावी पूड पटकन होते.
पावसाळ्यात काडेपेट्या कोरड्या राहण्यासाठी काडेपेटीत तांदळाचे ७ ते ८ दाणे टाकून ठेवावेत. काडेपेट्या दमट होत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धोका : या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करु नये!