Publish Date: Mon, 20 Apr 2026 (11:46 IST)
Updated Date: Mon, 20 Apr 2026 (11:52 IST)
उन्हाळा सुरू झाला की किचनमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे अन्न पटकन खराब होणं. त्यात दूध ही सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट ठरते. सकाळी आणलेलं दूध सुद्धा दुपारपर्यंत खराब होऊ लागतं.
दूध लवकर का खराब होतं?
उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात. त्यामुळे दूध आंबट होतं आणि फाटतं. जर दूध योग्य प्रकारे साठवलं नाही किंवा वारंवार बाहेर ठेवलं, तर ते आणखी लवकर खराब होतं.
दूध फाटू नये म्हणून सोपी ट्रिक
दूध उकळताना त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा (Baking Soda) घाला. दूध खराब होताना त्यामध्ये लॅक्टिक अॅसिड तयार होऊ लागते. खाण्याचा सोडा अल्कधर्मी असल्याने तो दुधातील आम्लपणा कमी करतो आणि दूध नासण्यापासून वाचवतो. जेव्हा तुम्ही दूध गरम करायला ठेवता, तेव्हा त्यात अगदी नावापुरता (एक लिटरला एक चिमूट) सोडा टाका आणि मग दूध उकळून घ्या.
दूध जास्त काळ टिकवण्यासाठी इतर काही महत्त्वाच्या टिप्स:
जास्त वेळ उकळवा: उन्हाळ्यात दूध आल्यावर ते एकदाच उकळून सोडू नका. दिवसातून किमान २ ते ३ वेळा दूध उकळल्याने त्यातील जंतू मरतात.
थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा: गरम दूध थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. यामुळे फ्रिजचे तापमान वाढते आणि दूध खराब होण्याची शक्यता असते. दूध पूर्णपणे थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवा.
भांडे स्वच्छ असावे: दूध ज्या पात्रात ओतणार आहात, ते भांडे नीट घासलेले आणि कोरडे असावे. भांड्यात आधीच्या दुधाचा थोडाही अंश असेल तरीही नवीन दूध लवकर नासते.
पाण्याचा वापर टाळा: दुधात वरून कच्चे पाणी मिसळल्यानेही बॅक्टेरिया वाढतात. शक्यतो दूध न आटवता तसेच गरम करा.
लक्षात ठेवा उन्हाळ्यात दूध अगदी काही तासांत खराब होऊ शकतं, त्यामुळे स्टोरेजची पद्धत योग्य असणं खूप गरजेचं आहे.
टीप: जरी सोडा घातल्याने दूध टिकत असले, तरी उन्हाळ्यात दूध जास्त दिवस साठवून ठेवण्यापेक्षा ते ताजे असतानाच वापरणे आरोग्यासाठी उत्तम असते. जर दुधाला थोडा जरी आंबट वास येत असेल, तर ते वापरणे टाळावे.
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे....
आणखी वाचा