लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचं वर्षभर टिकत नाही. लोणची टिकवण्यासाठी काही उपाय:
* सर्वप्रथम लिंबू किंवा कैर्या स्वच्छ धुऊन स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.
* ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे, ती बरणीसुद्धा स्वच्छ धुऊन कडक उन्हात तीन-चार तास वाळवून घ्या.
* विळी किंवा चाकूही स्वच्छ धुऊन उन्हात वाळून घ्या.
* लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्रीसह मिसळून घ्या. मिश्रण चांगलं हालवून घ्या. कैरीचं लोणचं असल्यास त्यात गरम करून थंड झालेलं तेल घाला.
* बरणीत तळाला थोडे भाजलेले मीठ पसरवा. त्यावर लोणचे भरा. लोणच्यावरही थोडे भाजलेले मीठ घाला.
* बरणी झाकून वरून एक स्वच्छ फडके बांधून बरणी ठेवून घ्या.
* रोज सकाळी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने ते लोणचे हालवा. असं सलग 8 दिवस तरी करा.
* लिंबाच्या लोणच्याची बरणी हवी असल्यास अधून-मधून उन्हात ठेवली तर लोणचे लवकर मुरते.
* कैरीचं लोणचं उन्हात ठेवू नये.