मैदा, रवा आणि हरभरा डाळीच्या पिठा पासून बनणारे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. पण या गोष्टी बऱ्याच काळ ठेवायला त्रासच होतो. बंद पाकिटात असलेले हे पदार्थ उघडल्यावर काही दिवस किंवा काही महिन्यातच खराब होऊ लागतात. काही दिवसातच यामध्ये कीटक किंवा आळ्या होऊ लागतात. यामुळे या गोष्टींचा साठा घरात कमीच करावा लागतो. किचन टिप्स बद्दल आपण बोललो, तर काही असे काही सोपे मार्ग आहेत ज्यांना वापरून आपण या गोष्टींना बऱ्याच काळ साठवून ठेवू शकतो.
* गव्हाचं पीठ सुरक्षित ठेवण्यासाठी आपण पिठात कडुलिंबाची पाने ठेवून द्या. असे केल्यास पिठात मुंग्या आणि गव्हातला माइट लागणार नाही. जर आपल्याला कडुलिंबाची पाने मिळत नसल्यास, आपण त्याचा ऐवजी तेजपान किंवा मोठी वेलची देखील वापरू शकता.
* रवा आणि गव्हाचा सांजा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण याला कढईत भाजून घ्या आणि थंड झाल्यावर यामध्ये 8 ते 10 वेलची घालून एकाद्या घट्ट झाकण्याचा डब्यात भरून ठेवून द्या. असे केल्यास कीटक आणि आळ्या होणार नाहीत.
* मैद्यात आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात पटकन किडे लागतात. कीड लागण्यापासून वाचविण्यासाठी आपण हरभराच्या डाळीचे पीठ आणि मैद्याला एका डब्यात ठेवून त्यामध्ये मोठी वेलची टाकून द्या. या मुळे किडे लागणार नाही.
* तांदुळाला आद्रता आणि बारीक किडे लागण्यापासून वाचविण्यासाठी 10 किलो तांदुळात 50 ग्रॅम पुदिन्याची पाने घालून ठेवा, या मुळे तांदुळात किडे होणार नाही.
* बदलत्या हंगामात हरभरे किंवा डाळीला कीड लागते या पासून वाचण्यासाठी डाळी आणि हरभऱ्यात कोरडी हळद किंवा हळकुंड आणि कडुलिंबाची पाने घालून ठेवू शकता. या मुळे किडे होणार नाही.
* साखर आणि मीठ पावसाळ्यात चिकटच नाही तर वितळतात देखील. ही समस्या टाळण्यासाठी त्यांना एका काचेच्या डब्यात किंवा बरणीत ठेवावं. आपण साखरेच्या आणि मिठाच्या डब्यात थोडे तांदूळ देखील ठेवू शकता.