Publish Date: Wed, 26 Aug 2015 (17:08 IST)
Updated Date: Wed, 26 Aug 2015 (17:22 IST)
* पीठ चाळताना, चाळणीत दोन-चार नाणी टाकवी. पीठ लवकर चाळले जाते.
* पुर्या खुसखुशीत हव्या असतील तर कणीक मळताना त्यात चिमूटभर साखर घालावी.
* पराठ्यांसाठी कणीक भिजवताना त्यात चमचाभर दही घालावे. पराठे मऊ होतात.
* पुरणपोळीची कणीक दुधाने भिजवावी. पोळ्या अतिशय मऊ होतात.
* पुलावासाठी तांदूळ शिजवताना त्यात एक चमचा साखर घालावी. भात मोकळा होतो.