Publish Date: Fri, 10 Jul 2015 (13:09 IST)
Updated Date: Fri, 10 Jul 2015 (14:05 IST)
* कांदे चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर चिरण्यापूर्वी कांदा अर्धा कापून 10 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवावा.
* टोमॅटो लवकर शिजवण्यासाठी त्यात चिमूटभर मीठ टाकावे.
* हिरव्या मिरचीत मीठ लावून फोडणीत टाकल्यास मिरचीचा रंग हिरवाच राहतो.
* चणे रात्री भिजत घालताना सोडा घालण्याऐवजी त्यात तीन- चार वेळा तुरटी फिरवावी.
* पावभाजीच्या भाजीत थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो.