suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दूध उकळत असताना भांड्यातून बाहेर पडणार नाही, 5 TIPS...

kitchen tips
असे बर्‍याच वेळा होत की आमचे लक्ष्य थोडेही इतके तिकडे झाले की गॅसवर गरम करायला ठेवलेले दूध भांड्यातून उतू व्हायला लागत. या प्रॉब्लम पासून ... बचाव करण्याचा मुख्य उपाय आहे. ज्या भांड्यात दूध गरम करत आहे त्या भांड्याच्या कोपर्‍यात थोडेसे बटर लावून द्या, आता दूध कितीही तापले तरी ते भांड्याच्या बाहेर येणार नाही... 
 
अशा 4 अधिक किचन टिप्स... 
1.  भाजीत मीठ जास्त झाले असेल तर काय करायला पाहिजे ... घाबरण्याची गरज नाही. त्यात पाणी टाकण्याची गरज नाही कारण पाणी टाकल्याने त्याचे ओरिजनल टेस्ट संपून जाईल. यात तुम्ही एक बटाटा सोलून टाकून द्या आणि 5 मिनिटानंतर तो परत बाहेर काढून घ्या. हा बटाटा मीठ सोखून घेईल.  
 
2. एक आठवड्यापर्यंत लिंबू कसे ठेवाल फ्रेश 
फ्रीजमध्ये ठेवलेले लिंबू दोन दिवसातच वाळून जातात. लिंबाला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यांच्यावर कोकोनट ऑइलची कोटिंग करून  फ्रीजमध्ये खुल्या कंटेनरमध्ये ठेवावे. एका आठवड्यापर्यंत लिंबू एकदम फ्रेश राहतील.     
 
3. पास्ताला उकळल्यानंतर स्टोवर पडण्यापासून कसे वाचवावे  
पास्ता उकळण्यासाठी पाणी गरम करताना त्यात त्यात एक चमचा खाण्याचे तेल टाकायला पाहिजे. उकळी आल्यावर त्यात पास्ता टाकावा. हे तेल पाण्याला उकळून गॅसवर पडण्यापासून बचाव करेल.  
 
4. पत्तागोभी रंग कसा ठेवाल ग्रीन  
पत्तागोभी जेव्हा शिजून जाते तेव्हा त्याचा रंग थोडा काळसर होतो. यापासून बचाव करण्यासाठी कोबी शिजवताना त्यात एक चमचा दूध घाला. तुमच्या भाजीचा रंग तसाच फ्रेश राहील.

Share this Story:

Follow Webdunia marathi