Publish Date: Wed, 03 Jun 2015 (17:51 IST)
Updated Date: Thu, 25 Jun 2015 (17:46 IST)
मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा.
तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो
पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा. यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो.
सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा. मनासारख्या आकारात कापता येईल.
रस्सा दाट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा चव मिक्सरला करून रश्श्यात घालावा.
कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.
भांडय़ाला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं.