एक क्षण तुला पाहण्या साठीकिती वाट पाहते मीप्रतिक्षे मधे अधीर होतात डोळेवाहते अश्रु धारा समवेतअंतर मधले तेच राहीलेवाट पाहीन मी अजुन तुझीसांग कशी ही ओढ अंतरीची ।।2।।
माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची ।।3।।