Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुझे येणे

- अनंत बावने

तुझे येणे
ND
प्रिये, तू येते - तो वसंत
प्रिये, तू जाते - तो ग्रिष्म ।

तू येताच - मन फुलतय्
कळी खुलून - फुल उमलतय् ।।

तू येताच - उसळते काहीतरी
माझ्या बोलण्यात - तू मौन राही ।

तुझ्या येण्याने - उरात धडकी
माझ्या जाण्याने - होतेस रडकी ।।

तुझ येणं - रोमांचकारी असते
तुझ्या जाण्याने - कोरडेपण येते ।

तु्‍या येण्याने - आधार वाटतो
तुझ्या जाण्याने - निराधार होतो ।।

Share this Story:

Follow Webdunia marathi