Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सदाबहार कट्टा....

-आरती घोडके

सदाबहार कट्टा....

वेबदुनिया

PR
कॉलेजचे दिवस म्हटलं की, प्रत्येकांच्या डोळ्यांसमोर आठवणींचा एक अल्बमच नकळत तरळतो. या अल्बममधले कितीतरी फोटोज वेगवेगळे असले तरी, त्यात एक फोटो मात्र कॉमन असतो. तो म्हणजे कॉलेज कट्टय़ावर ठाण मांडून बसलेल्या ग्रुपचा. शहरातील कित्येक महाविद्यालयांना कट्टा म्हणावा तसा शब्दश: कट्टा नसेलही, मात्र असे असले तरी कट्टय़ासदृश एखादा मौजमस्तीचा अड्डा मात्र नक्की असतो, कधी कॉलेजच्या आधी, कधी कॉलेजच नंतर, तर कधी लेक्चर बंक करून, थोडक्यात कधी ना कधी तरी प्रत्येकाने आपल आयुष्याचे काही क्षण या कट्टय़ाच्या सहवासात घालवलेले असतात आणि म्हणूनच कॉलेज संपल्यावर मित्र - मैत्रिणीप्रमाणेच या कट्टय़ावरची धमालमस्तीही कायम स्मरणात राहते. तसा वर्षभर हा कट्टा तरुणाईने बहरलेला असतो.

एरव्ही, वेळेअभावी या कट्टय़ावर ज्यांना फिरकताही येत नाही, असे काही माजी विद्यार्थी या कट्टय़ावर येऊन आपल्या आठवणींना उजाळा देताना कित्केकदा पाहाला मिळतात. यावेळी इथला माहोल कॉलेजच्या दिवसांमध्ये असतो तसा हिरवागार जरी नसला, तरी इथल्या वातावरणावर चढलेली सोनेरी झाकही मनाला आनंद देऊन जाणारी असते. गर्द काळ्या केसांमध्ये एखादा पांढरा केस जसा माणसाचा अनुभव अधोरेखित करतो, त्याचप्रमाणे या माजी विद्यार्थमुळे कट्टय़ाला मिळणारी सोनेरी छटाही त्या कट्टय़ाचा अनुभव सांगून जाते.


Share this Story:

Follow Webdunia marathi