आजच्या या युगात कोण देई साथ कोणा,
जाणवू लागतात वणव्यापरी संवेदना ||
एकट्याने होत होत्या पायवाटा मंद,
चालत होतो जेव्हा मी ध्येयाकडे बेधुंद ||
आयुष्याच्या वळणावरी भेटलीस जेव्हा तु मला,
हातात हात घेऊनी दिवस तो उजाडला ||
समजत नव्हती संज्ञाही प्रेमाची मला,
सारा सार समजाविला तू त्या प्रेमातला ||
शिकविले भरभरून द्यावे प्रेम एकमेकांकडे,
घेतले वचन कधी न जावे मर्यादेपलीकडे ||
दोघांनाही असावा अपुल्या प्रेमापरी सन्मान,
तेव्हाच ताठ राहील आपुल्या आईवडिलांची मान ||
असावे सोबत दोघांनीही एकमेकांच्या अपयशात,
आदर्श असाल तुम्ही या विशाल जगात ||
दूर असूनी प्रेमात हवा तो विश्वास न्यारा,
हृदयात असेल तेव्हाच आनंद सारा ||
आयुष्यात आलीस तू जेव्हा सोबतीला माझ्या,
झालीस राणी तू माझी आणि मी तुझा राजा ||
जरी केले प्रेम निस्वार्थ एकावरी,
द्यावी साथ त्यास आयुष्यभरी ||
ठेवावे आदर्श तिला जिने सोडला ना साथ संकटातूनी,
जगाने घ्यावी अशी ही प्रेरणा तिच्या त्या प्रेमातूनी ||