भ्रमात असणं पण कधी कधी चांगलं असतं,
नसतं ते मनाला लावून घेतल्या जात नसत,
हलक असतं माणूस, खोलात जात नाही,
नसत्या गोष्टींच्या विचारात सहसा पडत नाही,
जे आहे त्यास च सत्य मानतो, अन उगी बसतो,
आपल्या च दुनियेत नेहमी मशगुल असतो,
पण एकदा का भोपळा भ्रमाचा फुटला ,
सत्यात येऊनच तो मात्र पार लटपटला,
आपण ज्यास मानत होतो नितांत सुंदर,
ते आपल्या करीता नव्हेच, ह्याचा हा प्रत्यंतर,
मग येऊ लागते हळूहळू जाग, अन वास्तवते शी सामना,
चित्रं स्पष्ट होऊ लागते, स्पष्ट होते कल्पना!
सावराव लागत स्वतःला हेलपटण्या पासून,
पुन्हा उभं राहायचं असतं मजबूत पाय रोवून!!