Publish Date: Sat, 18 Sep 2021 (19:15 IST)
Updated Date: Sat, 18 Sep 2021 (19:35 IST)
लोपल डोळ्यांतल प्रेम जे तुझ्यासाठी होतं,
नुसती ओळख उरली होती,असच वाटत होतं!
नजरेआड तुला होऊच देऊ नये, असं वाटायचं,
नजरेतून उतरशील असं तू कारे वागायचं?
तोडायची भाषा करायची नाही, ठरवलं होत,
पण तडजोडीत जगायचं,हे कुठं मान्य होत,
चालवू असं ही जिथंवर जाईल तिथवर,
पडू देत कितीही ओरखडे, स्वतः च्या मनावर ,
नियतीचा खेळ म्हणून तो बघत बसायचं,
एकट्याने मात्र सतत कुढत राहायचं ...!