एक नवा बहाणा मिळून जातो!

मंगळवार, 2 जुलै 2019 (16:08 IST)
काळे ढग दाटून आले की,
सरींचा इशारा होऊन जातो.
सुसाट वाहणारा वारा मग,
मनाच्या खिडक्या उघडू जातो.
दूर कुठेतरी सर कोसळताना दिसते,
मधुर सुगंध मग या मातीचा सर्वत्र दरवळत तू राहतो.
लागतात जसे पावसाचे थेंब अंगाशी खेळायला,
पावसात भिजायला एक नवा बहाणा मिळून जातो!
- आसावरी उदय खोत

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख सौंदर्य खुलविणारे नारळ