Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरेंज मॅरेज का म्हणून उत्तम असते

अरेंज मॅरेज का म्हणून उत्तम असते
, बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (15:52 IST)
तुमच्यासाठी जोडीदाराचा शोध, तुमच्या कुटुंबीयांद्वारे केला जातो. नंतर कुटुंबीयांकडून संपूर्ण विधी-विधानाने लग्न लावण्यात येते. आता त्याला निभावून घेणे आणि नाते टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची असते.  
 
आमच्या समाजात आज देखील अरेंज मॅरेजला जास्त महत्त्व देण्यात येते. मग त्याचे मुख्य कारण काय आहे, हे जाणून घेऊ.   
 
1. सामाजिक रूपेण अनुकूल: कुटुंबाने शोधलेला जोडीदार तुमच्या समाज आणि समुदाय इत्यादीशी निगडित असतो. अशात तुम्हाला तुमच्या संस्कृतीत जास्त बदल करावा लागत नाही. सणावारापासून संस्कारापर्यंत तुम्हाला काही नवीन वाटत नाही, ज्यामुळे जास्त ओढाताण करावी लागत नाही.  
 
2. आपसी सन्मान: कुटुंबीयांनी शोधलेल्या जोडीदाराबद्दल सर्वांना नेहमी सन्मान असतो कारण कुठे ना कुठे अप्रत्यक्ष रूपेण पारिवारिक दबाव तुमच्यावर राहतो. तुम्ही दोघेही दांपत्य बंधनात अडकल्यानंतर बाकी नात्यांना तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.  
 
3. पारिवारिक संबंध : अरेंज मॅरेज केल्यानंतर तुम्हाला कुठेही तोंड लपवण्याची गरज पडत नाही आणि कुठलीही सफाई देण्याची देखील गरज भासत नाही. परिवारासोबत तुमचे नाते नेहमी मधुर राहतात.  
 
webdunia
4. सामंजस्य ठेवणे गरजेचे : अरेंज मॅरेजनंतर तुम्ही मनमानी करू शकत नाही, तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या नियम आणि कायद्यानुसार राहणे गरजेचे असते. अशात तुमच्यात अॅडजस्‍ट करण्याची भावना निर्माण होते. यामुळे तुम्ही कुठेही सर्वाइव करू शकता आणि परिवारासोबत चांगले संबंध बनवून राहू शकता.  
 
5. नेहमी प्रतिबद्ध राहणे : अरेंज मॅरेजनंतर तुम्ही फ्री बर्ड राहत नाही. तुम्हाला ऍडजस्ट करून आपल्या जोडीदाराप्रती प्रतिबद्ध राहवे लागते. अशात परिवार देखील तुमचा साथ देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi