Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नल-दमयंती निस्‍सीम प्रेमाचे प्रतीक

नल-दमयंती निस्‍सीम प्रेमाचे प्रतीक
ND
विदर्भ देशाचा राजा भीमाची मुलगी दमयंती आणि निषध देशाचा राजा वीरसेन यांचा मुलगा नल हे दोघेही रूपवान होते. ते दोघेही एकमेकांना न पाहता केवळ प्रशंसा ऐकूनच एकमेकांवर प्रेम करायला लागले. राजा भीमाने दमयंतीच्या स्वयंवर सोहळ्याचे आयोजन केले. त्यात इंद्र, वरुण, अग्नी व यम आदी अनेक देवतांना आमंत्रीत केले. दमयंतीशी विवाह करण्यास देवादिकांसह अनेक जण उत्सुक होते. चारही देव स्वयंवरामध्ये नल राजाचे रूप धारण करून आल्याने पाचही जण नलासारखे दिसत असल्याने दमयंती गोंधळली. मात्र तिचा प्रेमावर इतका विश्वास होता की तिने देवाकडून वरदान मागून नलाला ओळखून त्याची पती म्हणून निवड केली.

नल-दमयंती हे निःसीम प्रेमाच्या बळावर एकत्र आले खरे. मात्र काही काळ गेल्यानंतर त्यांच्यावरही विभक्त होण्याची वेळ आली. नल त्याचा भाऊ पुष्कराकडून सारीपाटाच्या खेळात आपले सर्वस्व हरवून बसला. त्यामुळे पुढे ताटातूट झाली. दमयंती एका राजघरण्‍याच्‍या मदतीने तिच्या माहेरी पोचली. दमयंतीचे वडील राजा भीम यांनी नलाला शोध घेण्याच्या उद़देशने दमयंतीच्या दुस-या स्वयंवराची घोषणा केली.

दरम्यानच्या काळात दमयंतीपासून ताटातूट झालेल्या नलाला कर्कोटक नावाच्या विषारी नागाने दंश केल्याने त्याचा रंग काळा पडला. तो पूर्णता कुरूप झाला. त्यामुळे नलाला बाहुक नावाचा सारथी म्हणून विदर्भात पोचला. आपल्या प्रियकरास ओळखणे दमयंतीस काही कठीण नव्हते. तिने नलाला सहज ओळखले. त्याने त्याचा भाऊ पुष्करासोबत पुन्हा सारिपाट खेळून त्याला पराभूत करून आपले गमावलेले सर्वस्व परत मिळविले.

दमयंती केवळ रूपानेच सुंदर नव्हती तर ती मनानेही तितकीच सुंदर होती. तिने आपल्या प्रेमाच्या बळावर पतीला ओळखून पुन्हा प्राप्त केले. इतकेच नव्हे तर त्याने जे-जे गमावले. तेही त्याला पुन्हा मिळवून दिले.

दमयंतीला नलापासून देवच काय कुणीही हिरावून घेऊ शकले नाही. तिचे नलावर असलेले निःसीम प्रेम व त्याच्या विषयी असलेली निष्ठा यामुळे ही प्रेमकथा आजही अजरामर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi