या वर्षीचा उन्हाळा म्हणजे अंगाची नुसती लाहीलाही करून करून सोडणार. दिवसभर ऑफिसमध्येत्या खटखट करणार्या फॅनच्या खाली अंगातून घामाच्या धारा निरंतर चालू. वरून लोकांची वर्दळ यांनी डोकं भावावून निघालं. कशाला या ऑफिसमध्ये नौकरीला लागलो, माझं मलाच खटकू लागला. चांगला एमपीएसची चा अभ्यास करत होतो. लागले असते पुन्हा दोन वर्ष पण सुखाची नौकरी तर मिळाली असती. हा असा उबग, नकोरे बाबा...ह्याच विचारात बॅगघेऊन ऑफिसच्च्या बाहेर पडला.दिवसभराचे रणरणते उन्हा आता थोडे शांत झाले होते. आकाशात ढगही जमा झाले होते. 'पाऊस येऊ दे रे बाबा' म्हणून मी देवाला विनवणी करत बसस्टॉपकडे निघालो. पाच मिनिट चालून जात नाही तोच जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग जमा झाले. आज पाऊस येणार या आंनदातच माझीपावले झपाझप बस स्टॉपकडे निघाली. पाऊस यायच्या आतच मला बसस्टॉप गाठायचा होता, पण नाही. टपोर्या थेंबाचा पाऊस सुरू झाला. म्हणून मी बंद असलेल्या चहाच्या आडोशाला गेलो.
मृगाच्या पहिल्या पावसाने मातीचा सुंगध चोहीकडे दरवळला. त्या सुगंधी वातावरणात माझ्या मनातही दोन ओळी दरवळल्या....
मद्यधुंद ही वेळ
मद्यधुंद हा वारा....
पुढे काय याचा विचार करीत असतानाच, चेहरा दुपट्ट्याने झाकलेली एक तरूणी पावसातूनच बचाव करण्याकरिता माझ्याजवळ येऊन उभी राहली. तेवढ्यातविजेचा कडकडाट झाला आणि मला माझ्या पुढच्या ओळी गवसल्यात्या नकळत माझ्या मुखातून बाहेर पडल्या
प्रिये तुझ्या येण्याचा हा कसला इशारा...
तिला ऐ ऐकू गेले. चेहर्यावरचा दुपट्टा काढून तिने विचारले, 'काही म्हणालात तुम्ही?' तीचं सौंदर्य तर अप्रतिम होतं. ती तिच्या चेहर्यावर पाहात होतो. पण तिचे शब्द कानावर आले आणि मी भानावर आलो. 'काय'? ती पुन्हा म्हणाली' मला काही म्हणाला तुम्ही'? घुटमळतच ती म्हणाली 'नाही' दहा मिनिटे शांततेत निघून गेली. पण पावसाचा वेग कमी होत नव्हता. मी तिच्याशी बोलायला संकोचत होतो. पण कविता करणे चालूच होते.
आकाशी नभ का फाटला
चोहीकडे गारवा हा दाटता
मंद झुळुक ही वार्याची
आणि बदलली लाली तिच्या चेहर्याची...
एवढा वेळ शांततेत गेला. तिलाही वाटत असावे मी बोलायला सुरुवात करावी. पण मी संकोचत होतो मग तीच बोलायला लागली. 'पाऊस थांबेल असं वाटत नाही.' मी नुसता होकार दिला. मी काय करतो कुठे राहतो हे सर्व तिने विचारले. पण हे सर्व तिला विचारण्याची माझी हिम्मत माझी होत नव्हती. रस्त्यावरील रहदारी तर पूर्णपणे कमी झाली. रस्त्यावरील मर्क्युरी लाईट सुध्द्दा लागले. मग मीच म्हणालो,, असं किती वेळ वाट बघायची. चला आपण निघू, पाऊस थांबेल असा वाटत नाही . अंधार सुध्दा पडला. अरे हो, पण तुम्ही राहता कुठे? ती म्हणाली 'बसस्टॉप जवळ' मी म्हणालो, मी पण बसस्टॉपकडेचनिघालो. चला आपण मिळूनच जाऊ तिने होकार दिला.
भर पावसात, शांत रस्त्यावर, मर्क्युरीच्या लाईटच्या पिवळ्या प्रकाशात, फक्त आम्ही दोघेच. तिच्या चेहर्यावर दवबिंदू प्रमाणे जमणारे पाण्याचे थेंब, झाडांच्या पानांतून टपटपणार्या पाणासारखे तिच्या केसांतून टपकणारे पाणी, ओल्याचिंब आंगाला चिटकलेले कपडे-काय अद्भूत अनुभव होता. मी स्वप्नात आहे की सत्यात हे कळत नव्हते. अजूनपर्यंत मी तिला तिचे नाव विचारले नव्हते. म्हणून हिम्मत करून तिला विचारलो, तुमचे नाव काय? ती हसून म्हणाली 'सोनाली...' हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे ही तर माझ्या वर्गात होती आठवी ते दहावी पर्यंत. माझा मागे सतत घुटमळायची. त्यामुळे माझे मित्र मला तिच्या नावाने चिडवायचे. म्हणून मी तिच्यापासून दूर दूर राहायचो. कधी कधी रागवायची पण किती बदलली ही. आधि कशी दिसायची आणि आता...किती सुंदर!...किती फरक पडला तिच्यात.
सोना, मला नाही ओळखली तू? मी आनंदाने विचारलो तर ते म्हणाली' मी तर तुला केव्हाचीच ओळखले पण वाटले माझे नाव एकून तू पुन्हा मला दूर दूर लोटशील' मी ओशाळला' अंग ते दिवस लहानपणीच होते. पण तू अशी भेटशील असं मला स्वपनातही वाटलं नव्हतं. आज फार आनंद होत आहे मला खरच मला फारा आनंद होत होता. आता तर तिच्या सोबत मन मोकळे प्रमाणे बोलू लागलो. एवढ्या दिवसात ती कुठी होती, काय करत होती, ही सर्व विचारपूस झाली. नकळत तिचा हात हातात घेऊन मी चालू लागलो. तिनेही नकार दिला नाही.
असं वाटत होत, हा रस्ता संपूच नये. असेच आम्ही दोघे. फक्त दोघेच चालत राहावे. हा पाऊस थांबू नये, ही रात्र संपू नये. पण नाही बसस्टॉप जवळ आला तशी ती थांबली. पंकज, मी निघते आता. इकडेच माझ घर आहे. बरं येते मी...'असं म्हणत तीने माझ्या हातून आपला हात अलगद काडून घेतला आणि एका अरूंद गल्लीतून ती जायला लागली. मी तिथेच थांबून तिच्याकडे पाहात होतो. दृष्टीआड होईपर्यंत तिनेही तिनदा मागे वळू बघितले. तीनजरे आड झाली.
आंनदातच बस स्टॉपवर आलो. ओल्या कपड्यानिशी बसमध्ये बसलो. पण मनामध्ये फक्त खिडकीच्या बाहेर पडणारा पाऊस आणि हातात हात घेतलेली सोना. बस सुरु झाली आणि मी भानावर आलो. बघतो तर माझ्याच सीटवर बाजूला 'मोनाली...'तीही ओल्या कपड्यानिशी जिच्यावर मी कॉलेजजीवनात जीवापाड प्रेम करीत होता ती मोना' ही असली कसली पहिल्या पावसाची भेट.
- पंकज वनकर