Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साक्षी धोनीचं नवं प्रेम

साक्षी धोनीचं नवं प्रेम
, शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (12:55 IST)
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेन्द्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीचं प्रेम एका नव्या व्यक्तीवर जडलं आहे. धोनी क्रिकेटमध्ये व्यस्त असताना त्याची पत्नी साक्षी मात्र नव-नव्या प्रेमाच्या शोधात आहे. यातलं ट्विस्ट म्हणजे धोनीलादेखील तिच्या या नव्या प्रेमाबद्दल माहीत आहे. केवळ धोनीच नव्हे तर आपल्या मित्रांना आणि चाहत्यांनाही आपल्या नव्या प्रेमाची माहिती व्हावी यासाठी मिसेस धोनी यांनी आपलं हे नवं प्रेम सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

अहो, असं गोंधळून जाऊ नका आणि कुठलाही गैरसमज करुन घेऊ नका. कारण साक्षीचं हे नवं प्रेम जडलं आहे, तिच्या हेअर डिझायनरवर. साक्षी धोनी तशी सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव असते. साक्षी धोनी सोशल साईटस् तिचे वेळोवेळी अपडेट फोटोज शेअर होतात. यावेळी तिनं शेअर केलं आहे, तिच्या हेअर ड्रेसर सपना भवनानीसोबत आपला फोटो शेअर केला व त्याच्या कॅप्शनमध्ये तिनं पुढे love love love!असं लिहिलं आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. साक्षीचं हे प्रेम यावेळी चांगलंच चर्चेचं ठरलं हे वेगळं सांगायची गरज नकोच.

साक्षीच्या या फोटो ट्विटला सपना भवनानीनंदेखील रिट्विट केलं. तुम्ही म्हणाल ही सपना आहे तरी कोण? तर, सपना भवनानी ही बिग बॉस-6 मध्ये तसेच ‘अग्ली और पगली’ आणि ‘प्यार के साइड इफेक्ट’ मध्ये अभिनय करताना दिसली होती. साक्षी तशी सोशल साईटस्वर चांगलेच अपडेटस् करत असते. तिच्या फोटो, टेक्स्टमुळं अनेकदा वादही झाले. तिच्या फोटोंमुळे कधी ती प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं गेलं, तर कधी दुसरं काही. पण तरीही साक्षीनं आपलं फॅशन सोडलं नाही. कधी पार्टीचे फोटो ती खुल्लम खुल्ला शेअर करताना दिसून आली.
    


Share this Story:

Follow Webdunia marathi