Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नि:शब्द मनाची भाषा

नि:शब्द मनाची भाषा

वेबदुनिया

आज बर्‍याच दिवसांमध्ये तुझ्याशी बोलणे झाले. कॉलेजमध्ये असताना तुझ्या समोर कधीही मी बोलू शकलो नव्हतो. ते दिवसच वेगळे होते. तिथे फक्त शब्दांची आणि मनांची भाषा चालायची. 

आपल्या समोर कोण आहे, ते काय बोलतात, याचे साधे भानही मनाला नसत. तुझ्या काळ्याशार डोळ्यातून काहीतरी बाहेर येतय असं नेहमी वाटायचं. तुही मग हळूवार तुझ्या पापण्‍यांना मिटत माझ्या डोळ्यांना होकार द्यायचीस.

ते दिवस विसरणंच अशक्य आहे. त्या शब्दांचा अर्थ कळायलाही मला बरेच दिवस लागले. बॉटनी, केमेस्ट्री हे विषय नेहमीच मला लवकर समजत. मॅथ इतरांना थकवत तर मीही त्याच्याशी दोन हात करत सारे कोडे उलगडवायचो. या सार्‍या प्रकारात ही भाषा अर्थात डोळ्यांची भाषा शिकायचं कुठेतरी राहुन गेलं.

मनाला हे सारं समजत असेल का? मग आपल्याला का हे उमजत नाही? असे असंख्‍य प्रश्‍न मनाला भेडसवायचे. आज मला या भाषेचे ज्ञान झाले आहे.

तुझ्या व माझ्या मनाची ही नि:शब्द भाषा आज एखाद्या फुलाप्रमाणे उमलत आहे. खरंच किती वेगळी असतेना ही भाषा.

आपला फारसा संबंध नसतानाही आपल्याला एकमेकांडे आकर्षित करते. आपल्याला एकमेकांकडे खेचते. कितीही कंटाळा आला, बोर झालं तरी वेडं मन एका जागेवरुन उठण्‍यास तयारच नसतं. आता दिसेल ती, थोडावेळ थांब, इतकी काय घाई, पुढच्या बसने जाता येईल, आईला काहीतरी सांगू. वाण्‍याचे दुकान बंद होते, नाही आणता आले सामान, लाईट बिलासाठी मोठी रांग होती, नाही भरता आलं बिल, उद्या भरतो बाबा. अशी अनेक कारणं सांगता येतील. पण मनाचं काय? त्याला कसं समजवांयचं?

तिकडून कोण येणार ते आपल्या फारसे ओळखीचे नाही. आई, बाबांसाठी खोटं का बोलायचं? असं समजावलं तरी मन एकायला तयार होत नाही. कारण त्याला ती भाषाच कळत नसते. समोर येणारी व्यक्ती, तिचे मन आपल्याला काही तरी सांगणार आहे, आपल्याला ते बिल, सामान या सार्‍यांपेक्षा महत्वाचे आहे, हेच ते मन सांगत असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जंकफूड गर्भवतींसाठी विषासमान