तुमचं तिच्याशी असलेलं नातं तुटलंय? प्रेमभंगाच्या अग्नीत तुम्ही पोळून निघत आहात? मग खाली दिलेल्या टिप्स अनुसरण्याचा प्रयत्न करा. प्रेमभंगाचं दुःख नक्की कमी होईल.
१. व्यवस्थित जेवा.
रोजचं जेवण व्यवस्थित जेवा. त्यात व्हिटॅमिन सीचा समावेश असू द्या. त्यामुळे तुमच्यात सिरोटोनिन या हार्मोनचे प्रमाण वाढेल व तुम्ही निराशेचा सामना करू शकाल.
२. मस्तपैकी फिरायला जा.
मोकळ्या हवेत मस्तपैकी फिरल्याने मनावरचा ताण दूर होतो.
३. व्यायामशाळेत जा.
व्यायामशाळेत जाऊन चांगली दमणूक होईल असा व्यायाम करा. त्यामुळे तुमचे शरीर व मन ताजे होईल.
४. सुटीवर जा.
बॅगा उचला नि चालू पडा आपल्या आवडत्या पिकनिक स्पॉटकडे.
५. 'स्पा'मध्ये जा.
हा उपाय शहरी मुला-मुलींसाठी आहे. चांगल्या 'स्पा'मध्ये जाऊन मस्तपैकी स्वतःला रगडून घ्या. छान अंघोळ करा. बघा 'फ्रेश' वाटेल.
६. घरातली अडगळ आवरा.
घरात तिची लव्ह लेटर्स, फोटो आधी काढून टाका. त्यांना घरातून आणि मनातून पूर्णपणे फेकून द्या.
७. भाषा शिका.
नवी भाषा शिका. नव्या लोकांना भेटा. त्यांना तुमचे विचार ऐकवा. त्यामुळे तुम्हाला तुमचीच नवी ओळख होईल. हरवलेला आत्मविश्वास सापडेल.
८. लिहून मोकळे व्हा.
मनात जे खदखदतय ते कागदावर मोकळे करा. त्यामुळे तुमच्या भावनांना वाट मिळेल.
९. चॉकलेट खा.
चॉकलेट खाण्याने प्रेमभंगांचं दुःख कमी होतं. दुःख चावत बसण्यापेक्षा चॉकलेट चावणं केव्हाही उत्तम.
१०. नवे कपडे घाला.
बाजारात जाऊन नवे कपडे आणा आणि ते घाला. त्यामुळे छान वाटेल. आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटेल. तणाव दूर होईल.