Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बर्थडे किंवा एनिवर्सरी विसरला? तर ठोका हा बहाणा

बर्थडे किंवा एनिवर्सरी विसरला? तर ठोका हा बहाणा
बर्थ डे असो वा एनिवर्सरी, पुरुषांना कोणतीही तारीख लक्षात ठेवणं अवघड जातं. त्याच्या या स्वभावामुळेच त्यांची पत्नी किंवा गर्लफ्रेंड रुसून जाते आणि पूर्ण दिवसाचं वाटोळं होतं. अशात जर एखादा खरा वाटणारा बहाणा सांगितला तर रागापासून वाचून तो स्पेशल दिवस सेलिब्रेटही करता येऊ शकतो.
 
तारखेचं गोंधळ
लग्नाची वर्षगाठ विसरला असाल तर लगेच म्हणा की अरे! ती तर फक्त फॉर्मॅलिटी होती. आपल्या गाठी तर तेव्हाच जुळल्या जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो. पण हो हे बोलताना पहिली डेटची तारीख लक्षात असायला हवी नाही तर पुन्हा घडू शकतं युद्ध....


सरप्राइज देणार होतो
हा सर्वात बेस्ट बहाणा आहे. कारण आपण सरप्राइजची तयारी केलेली नसली तरी ती पटकन ऑनलाईन बुके आणि केक ऑर्डर करून केली जाऊ शकते. किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करून हातोहात सर्व व्यवस्था होऊ शकते. या परिस्थित आपली पार्टनर खूप खूश होईल आणि तिला जरादेखील शंका येणार नाही.

webdunia

मी विसरभोळा आहे
ही युक्ती नवीन रिलेशनमध्ये लागू होऊ शकते. इमोशनली आपण आपल्या पार्टनरला हे पटवून देऊ शकता की मी विसरभोळा आहे. कित्येक तारखा मला लक्षात राहत नाही वगैरे वगैरे. पण हो... हा बहाणा देत असताना दोन-तीन खरे-खोटे उदाहरण ही द्यावे लागतील हे विसरू नका. 

webdunia

माझे बॅड लक खराब आहे
आपली चूक बॅड लक वर टाका. तिला असे सांगा की मी तुला सिनेमाला किंवा एखाद्या इवेंटला किंवा आउटिंगला घेऊन जाणार होतो पण बुकिंग मिळालीच नाही. त्यामुळे प्लान फसलं. आणि पुढच्या आठवड्याला आपण नक्की जायचं हे प्रॉमिस द्या.

webdunia
 

ट्रॅफिकचा बहाणा
ट्रॅफिकचा बहाणा नेहमी यशस्वी ठरतो. असे सांगा की मी ऑफिसहून तर वेळेवर निघालो पण रस्त्यात इतकी रहदारी होती की ज्वलेरी शॉप किंवा मॉल बंद व्हायची वेळ झाली होती. पण अशात पुढल्या दिवशी गिफ्ट घेणे विसरू नका. 

webdunia

डिलिव्हरी सिस्टमवर राग काढा
आपली चूक सुधारण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या डिलिव्हरी सिस्टमवर राग काढून आपण वाचू शकता. पत्नी किंवा गर्लफ्रेंडला आवडतं असलेली एखादी वस्तू मागवली असून ती वेळेवारी पोहचली नाही या गोष्टीचा दु:ख चेहर्‍यावर असू द्या. 

webdunia

अशा प्रकारे आपण तो स्पेशल दिवस तरी रागात न बुडवता प्रेमाने सेलिब्रेट करू शकाल पण हो त्या दिवशी जे खोटं बोलला असाल त्याची भरपाई दुसर्‍या दिवशी किंवा विकेंडला चांगल्या गिफ्ट आणि पार्टीने केली पाहिजे हे मात्र विसरू नका.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi