Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कामावरून परत आल्यावर जोडीदारासह या गोष्टी करणे टाळा

कामावरून परत आल्यावर जोडीदारासह या गोष्टी करणे टाळा
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (22:54 IST)
आपण आपल्या जोडीदाराला प्रत्येक गोष्ट सांगता . प्रत्येक गोष्ट सांगण्याची योग्य वेळ असते. अनेकदा लोक चुकीच्या वेळी अशा गोष्टी बोलतात, जे त्या वेळी करणे योग्य नव्हते. अशा वेळी समोरची व्यक्ती तुमच्यावर रागावू शकते.

अनेकवेळा जोडीदाराचा मूड ठीक नसतो आणि त्यावेळी काही बोलले तर नातेही बिघडते. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून ते घरी येतात. तेव्हा तासनतास दूर राहिल्यानंतर आपण जोडीदाराला भेटता. ते घरी आल्यावर त्यांच्याशी विचारपूर्वक बोला. कामावरून ते परत आल्यावर त्यांच्यासह या गोष्टी करणे टाळा. अन्यथा आपल्या नात्यात दुरावा येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 चुका सांगणे - बाहेरून घरी येताच जोडीदाराच्या चुकांबद्दल बोलू नका . जरी त्यांच्या एखाद्या गोष्टी बद्दल वाईट वाटले असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल नाराज झाला असेल तर, ऑफिसमधून लगेच घरी येऊन त्यांच्या चुकांवर चर्चा करायला बसू नका. असं  केल्याने दोघांमध्ये वाद होऊ शकतो.
 
2 काम सांगणे-ऑफिसमधून घरी येताच त्यानां कोणतेही काम सांगू नका ,  आपल्या प्रमाणे जोडीदार देखील थकलेला असणार, अशा परिस्थितीत बाहेरून आल्यास त्यांना लगेच काम देऊ नका. त्यापेक्षा आधी समजून घ्या त्यांचा मूड कसा आहे? ते व्यस्त आहे  का? मग त्यांना आपल्याला काय हवे आहे ते सांगा.
 
3 खर्चाबद्दल बोलणे- बोलायचे तर, इतर काही बोला. घरी येताच खर्चाबद्दल बोलू नका. यासाठी योग्य वेळ निश्चित करा. अर्थसंकल्प, पैशाचा हिशेब यासाठी योग्य वेळ असते. कामावरून येताच खर्चावर चर्चा सुरू केली तर त्याचे रूपांतर वादात होऊ शकते.
 
4 रुक्षपणा -- ऑफिसमधून घरी परत आल्यावर कदाचित आपले मूड ठीक नसेल किंवा आपण थकलेले असाल. परंतु या सर्व गोष्टींचा परिणाम घरी तुमची वाट पाहणाऱ्या जोडीदारावर होऊ देऊ नये . कामाचा राग आणि ताण त्यांच्यावर काढू नका .त्यांच्याशी रुक्ष पणे किंवा उद्धटपणे बोलू नका. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भरलेल्या टोमॅटो ची चविष्ट रेसिपी