आपल्यालाही झालं असेल Love at first sight तर हे वाचून बसू शकतो धक्का

'पहिल्या नजरेत प्रेम झाले' हे वाक्य अगदी सहज ऐकायला मिळतं. सिनेमात, मित्रांच्या तोंडातून किंवा इतर प्रेमाच्या किस्से ऐकताना पण त्या प्रेमळ विचारात गुंतण्यापूर्वी हे जाणून घ्या की वास्तविक काहीही नसतं. हे आम्ही म्हणत नाहीये तर एका शोधात हे कळून आले आहे. 
 
हैराण होण्यासारखे काही ही नाही कारण हे आपणंही जाणता की अगदी पहिल्या नजरेत सहजासहजी कुणीही प्रेमात पडत नसतं. असे होत असेल तर त्याला प्रेम नव्हे वासना म्हणू शकतो. लव्ह आणि लस्टमध्ये अंतर समजण्याची गरज असते. प्रेम आणि आकर्षण वेगळ्या गोष्टी आहे. आणि आकर्षणाला प्रेम समजण्याची चूक करणार्‍यांचे हृदय तुटायला वेळ लागत नाही. 
 
नेदरलँडच्या विश्वविद्यालयाद्वारे केलेल्या या शोधात स्पष्ट झाले आहे की लव्ह एट फर्स्ट साइट केवळ फिजिकल अट्रॅक्शन असतं. या शोधात अनेक लोकांना त्यांच्या रिलेशनशिप बद्दल विचारण्यात आले. नंतर त्यांना अनोळखी लोकांचे फोटो दाखवण्यात आली आणि ज्यांप्रती आकर्षण निर्माण झाले त्याच्यासोबत डेटिंग फिक्स केली गेली. नंतर पार्टनर्सबद्दल फिलींग्स विचारल्या गेल्या.
 
परिणाम समोर आले की लव्ह एट फर्स्ट साइट सारखं काही नसतं. ते प्रेम नसतं. निश्चितच या रिसर्चमुळे अनेक तरुणांना धक्का बसला असेल. असे आशिक जे शाळा, कॉलेज, ऑफिस, बस स्टॉपवर पहिल्या नजरेत आपलं हृदय काढून ठेवून देतात.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पेरूचे आरोग्यदायी सरबत