Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ती मागणार नाही पण प्रेमात यावर तिचा हक्क आहे

ती मागणार नाही पण प्रेमात यावर तिचा हक्क आहे
मुलींच्या मुलांकडून काय अपेक्षा असतात हा प्रश्न सोडवणे कठिण असलं तरी हे जाणून घेणे आवश्यक आहे की मुली मुलांपेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाच्या असतात. आपल्या योग्य पार्टनर व्हायचं असेल तर हे जाणून घेणे गरजेचं आहे की तिला आपल्याकडून काय हवंय. म्हणून आज आम्ही आपल्याला अशा गोष्टी सांगत आहोत ज्या मुली बहुतेकच स्वत:हून आपल्याला सांगेल पण मनात पार्टनरकडून तिच्या या अपेक्षा असतात.
 
सन्मान
कोणत्याही नात्यात सन्मान अत्यंत आवश्यक आहे. मुलींना देखील रिलेशनशिपमध्ये सन्मानाची अपेक्षा असते. आपण जेव्हा तिच्यासोबत असता तेव्हा चारचौघात तिच्यावर चिडणे, तिला खाली पाडून बोलणे, स्वत:ला श्रेष्ठ समजून तिला महत्त्व न देणे ही आपली मोठी चूक ठरू शकते. उलट आपण तिला सन्मान दिल्यास तिला आपल्यावर गर्व वाटेल. आपल्या नात्यात प्रेम आणि आत्मविश्वास वाढेल आणि तीही तेवढ्याच सन्मानपूर्वक वागेल.
 
क्वालिटी टाइम
आपल्याला वेळ असल्यावर तिच्याशी बोलणे आणि वेळ नसल्यावर दुर्लक्ष करणे हे योग्य नाही. आपण व्यस्त असाल तरी फ्री झाल्यावर लगेच तिच्यासोबत क्वालिटी टाइम घालवल्याने तिचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे तिला कळून येईल. याने दोघांमधील बंधन घट्ट होतील. एकदा तिला हे कळल्यावर आपण व्यस्त असला तरी आपल्याला स्पेस देईल आणि विश्वासही कायम राहील.
 
विनम्रता
आपण बाहेर फिरताना आपला इतरांशी व्यवहार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. म्हणून प्रत्येकाशी वागताना विनम्रता असावी. आपल्या हातून चूक घडल्यास सॉरी म्हणायला मागे-पुढे बघून चालणार नाही. अडिग स्वभावाचे लोक भविष्यासाठी धोकादायक असल्याचे मुलींना जाणवतात. यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.
 
प्रामाणिकता
मुलींना प्रामाणिक मुलं पसंत येतात. आपल्या बोलण्यात आणि कतृकतृत्वात समान व्यवहार दिसला पाहिजे. गैरव्यवहार मुलींना मुळीच आवडत नाही.या सर्व गोष्टी मुली स्वत:हून मागत किंवा सांगत नसल्या तरी त्या आपल्या वागणुकीवरून सगळं बारकाईने पाहत असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या प्रकारे ओळखा भेसळयुक्त दूध