Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेट दिवस (चॉकलेट डे)

चॉकलेट दिवस (चॉकलेट डे)
काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे म्हणूनच चॉकलेट डे साजरा केला जात असावा. चॉकलेट डे व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस असतो जो प्रत्येक वर्षी 9 फेब्रुवारीला फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. या देशातील युवा एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.  
चॉकलेट डे कसा साजरा करतात  
 
प्रत्येकाच्या जीवनात चॉकलेट डे हा दिवस एक नवीन चव घेऊन येतो, सर्वजण याला फारच शांतिपूर्वक आणि मनातून साजरा करतात. हा पश्चिमी संस्कृतीचा उत्सव आहे जो पूर्ण विश्वात फार मोठ्या संख्येत लोकांमध्ये चॉकलेट प्रेमाने वास्तविक प्रेमाची एक क्रांती घेऊन येतो. या खास दिवसात सर्वजण आपल्या आवडत्या लोकांसाठी मिठाईच्या दुकानातून किंवा बेकरीहून चॉकलेट विकत घेण्यासाठी गर्दी करत असतो. चॉकलेट डे उत्सव सर्वांना स्वादिष्ट चॉकलेटला खाणे आणि गिफ्टमध्ये देण्यासाठी एक तार्किक कारण देतो.  
 
नात्यात गोडवा वाढवण्यासाठी त्यांना एकत्र आणतो तसेच प्रियजन आणि मित्रांसाठी कुठल्याही प्रसंगी चॉकलेट भेट केल्याने सर्व प्रकारच्या चिंता, दुःख आणि गैरसमज दूर करण्यात मदत करतो.  
 
आपले प्रेम किंवा व्हॅलेंटाईनकडे आपले प्रेम आणि आकर्षणाला प्रदर्शित करण्यासाठी चॉकलेट दिली जाते. मैत्रीच्या स्तराला वाढवण्यासाठी किंवा प्रेम प्रस्ताव देण्यासाठी आपली महिला मित्रांना तरुणांद्वारे चॉकलेट दिली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेहर्‍यावर घासा टोमॅटो, पहा फरक