Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ
, रविवार, 29 मार्च 2020 (12:43 IST)
हा काळ असा आहे की आपल्याला आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत असेल. व्यस्त जीवनात ज्या क्षणांची आपण वाट बघत असता तो आपोआप मिळाल्यावर ही वेळ भांडण्यात वाया घालवू नका. या काळात आपण आपली पर्सनल लाईफ अपग्रेड करु शकता. 
 
खुलुन चर्चा करा 
सोबत चांगला वेळ घालवताना एकमेकांशी उघडपणे चर्चा करा. सुरुवात ‍कठिण वाटत असली तरी या प्रकारे गप्पा केल्याने नातं मजबूत होईल. आपण पार्टनरच्या कोणत्या गोष्टीमुळे असंतुष्ट आहात किंवा आपल्या ज्या गोष्टी आवडत नाही त्या प्रेमाने शेअर करा. याने आपसात जवळीक निर्माण होईल आणि जीवनात पुन्हा एकदा रस भरेल.
 
नकार द्या 
बेडवर काही नवीन प्रयोग हवेहवेसे वाटत आहे वा नवीन प्रयोग आवडत नाहीये या बद्दल स्पष्ट सांगा. नात्यांमध्ये ईमानदार राहाल तर सुखी रहाल. 
 
कौतुक करा
नात्यात सकारात्मकता देखील आवश्यक आहे. कोणत्या मूव्हने समोरच्याचं मूड बनतं त्यासाठी प्रयत्नशील रहा तर मजा कायम राहील.
 
रूची वाढवा
कोणतेही काम करायचे म्हणून केल्यास मजा वाटत नाही. आवड-निवड लक्षात घेऊन चांगले परिणाम मिळू शकतात. कोणत्याही मूव्हमुळे समोरचा सहज होत नाहीये तर सोडतं घ्या. समोरच्याची रुची देखील जाणून घ्या. 
 
स्वाभाविकपणा असावा
अनेकदा व्हिडिओ बघून तसं वागण्याच्या प्रयत्नात सिचुएशन बिघडते. व्हिडिओ दर्शवण्यात येणारे शॉट खरे समजून स्वत:ही त्रास करुन घ्याल आणि समोरच्याला आपण योग्य नाही अशी जाणीव होईल त्यापेक्षा स्वाभाविक रहा. 
 
वेळ द्या
समोरच्याला मूडमध्ये येण्यासाठी वेळ द्या. आपल्याला घाई होत असली तरी दोघेही एकाच मूडमध्ये नसल्यास मजा बिघडू शकतो. आपण समोरच्याला रोमांचित करण्याचा प्रयत्न करा. स्पर्श, चांगल संवाद दोघांना सुखद जाणीव होण्यात मदत करेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील लांब..