Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेमात पडण्यासाठी चार मिनिटे पुरेशी!

प्रेमात पडण्यासाठी चार मिनिटे पुरेशी!

वेबदुनिया

प्रेमात पडण्यासाठी किती वेळ लागतो असे तुम्हाला वाटते? 'नजरें मिली दिल धडका' अशीच अवस्था 'लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट'मध्ये होत असल्याने प्रेमात पडण्यासाठी काही क्षण पुरेसे आहेत असेच कुणालाही वाटू शकते. आता याबाबत एका पाहणीत असे आढळले आहे की, केवळ 240 सेकंदांची बातचितही तरुण जोडप्याला प्रेमात पाडू शकते!

स्पीड डेट्‍सने याबाबतची पाहणी केली आहे. त्यात असे दिसून आले की, ज्या तरुणीबरोबर तरुण डेटींग करीत असतो तिच्याकडे जर पूर्ण लक्ष असेल तर पहिल्याच भेटीत चांगले परिणाम दिसू शकतात. पहिली डेट यशस्वी झाल्यावर तरुणी दुसर्‍या भेटीसाठीही उत्सुक राहू शकते. जे पुरुष स्त्रीची स्तुती करतात त्यांना याबाबतीत दुसरी संधी मिळू शकते. एखाद्या तरुणीच्या छंदांबाबत कौतुकाने ऐकणे आणि तिच्याबरोबरच्या संवादात रूची दाखवणे महिलावर्गाला आवडते! एखाद्या व्यक्तीबाबत जाणून घेण्यासाठी चार मिनिटांचा काळ पुरेसा असतो आणि इतक्या वेळेतही एखादे जोडपे प्रेमात पडू शकते. या स्थितीत महिलाच पॉवरफूल असतात व कोणताही निर्णय घेणे त्यांच्याच हातात असते हे यावेळी पुरुषांनी लक्षात घेतले पाहिजे, असे प्रा. डॅन फॅकरफरलँड या तज्ज्ञाने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्राय स्टायलिश कोट!