जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो. देशात आणि परदेशात लग्नाबद्दल समान विचार सर्वत्र दिसल्याचे एका सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. भारतात राहणार्या लोकांना वाटते की, पाश्चिमात्य देशांत लग्न हा एक भौतिक संबंध असतो. मात्र, तसे काहीही नाही. तो एक गैरसमज आहे. पाश्चिमात्य देशातही जोडीदाराबाबत प्रत्येक जण जागृत असतो. येथे प्रत्येक जण खुल्यामनाने बोलतात. लग्न हे आयुष्यभर प्रामाणिकपणे सोबत राहण्याची बाब आहे. ही बाब निभविणे सहज शक्य नाही.
ब्रिटनमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. एक मुलगा किंवा मुलगी आपल्या जीवनसाथीबाबत काय काय चांगले गुण आहेत, याबाबत विचार करतात. यात मुलगे मुलीसोबत मैत्री करण्यापूर्वी आधी चौकशी करतात की या मुलीचे किती मित्र आहेत. मुलगे मुलीच्या चारित्र्याबाबत माहिती काढतात. तिचे कोणाबरोबर लिंकअप तर नाही ना. मुलगे सुंदर मुलींशी मैत्री ठेवू शकतात. मात्र, त्यांच्या होणार्या लाईफपार्टनरचे (जोडीदार) कोणी मित्र असता कामा नये. किंवा मैत्री असावी. प्रत्येक मुलाची इच्छा असते आपली जोडीदार ही हॉट आणि सुंदर सनी लिऑनप्रमाणे असावी. मात्र, आपल्या घरी एक आदर्श स्त्री असावी. ती नेहमी साडीमध्ये दिसावी. ब्रिटनमध्ये ऑनलाइन सर्व्हेत 70 टक्के मुलांनी सांगितले की, हॉट ग्लॅमर नको. साधी स्मार्ट बायको असावी. तसेच या सर्वेक्षणात भारतीय मुलांनीही सहभाग घेतला. मिनी स्कर्टवाली प्रेमिका हवी असते. मात्र, बायको ही साडी घालणारी असावी.