Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Love Tips : डेटवर जातांना करू नका या चुका

Love Tips : डेटवर जातांना करू नका या चुका
, रविवार, 7 एप्रिल 2024 (07:30 IST)
तुम्ही देखील डेटिंग एप वर आपल्या योग्य मॅच पाहत आहात का? किंवा एकदाचे तुम्हाला आपल्या जोडीदाराला डेट करण्याचा चांस मिळाला असेल तर या चुका करू नका. आजच्या काळात डेटिंग कल्चर खूप सामान्य आहे.  मोठया मोठया शहरांमध्ये नेहमी लोक डेटिंग एपचा उपयोग करतात. कोणत्याही रिलेशनशिपला सुरु करण्यापूर्वी  त्या व्यक्तीला जाणून घेणे गरजेचे असते. आपल्या जोडीदाराला जाणून घेण्यासाठी डेट एक चांगली कल्पना आहे. डेट मध्ये तुम्ही एकमेकांशी आपले विचार व्यक्त करतात. सोबतच आपली आवड नावड शेयर करतात. सामान्यतः अनेक लोकांसाठी डेट वर जाणे सोपे नसते. अनेक अशा चुका आपण पहिल्या डेट वर करतो. या चुकांमुळे गोष्ट बिघडते. कारण तुमचे फर्स्ट इम्प्रैशन हेच लास्ट इम्प्रैशन असते. चला जाणून घेऊ या डेट वर जातांना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. 
 
1. उशिरा पोहचणे     
अनेक लोक प्रत्येक ठिकाणी उशीर करतात आणि त्यांना वेळेवर पोहचण्याची सवय नसते. तसेच ट्रॅफिक आणि काममुळे खूप वेळेस पोहचायला उशीर होतो. डेट वर नेहमी वेळेवर पोहचावे. कोणालाच वाट पाहायला आवडत नाही. सोबतच हे तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रभावित करते. समोरच्या व्यक्तीच्या वेळेचा मान ठेवणे आणि वेळेवर पोहचण्याचा प्रयत्न करावा. 
 
2. पर्सनल स्पेसचा सम्मान करावा  
अनेक लोक पहिल्या डेट वर जास्त फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेसचा सम्मान करायला हवा. पहिल्या डेट मध्ये जास्त फिजिकल कांटेक्ट करण्याचा प्रयत्न करू नये. सोबतच असा कोणताही खाजगी प्रश्न करू नये ज्यामुळे तुमचा जोडीदार अस्वस्थ होईल. जास्त खाजगी प्रश्न विचारल्याने तुमच्या व्यक्तिमत्वावर नकारात्मक प्रभाव पडेल. 
 
3. सारखा फोनचा उपयोग करू नका    
अनेक लोक बोलतांना मोबाईल हाताळत असतात. पण तुमचा जोडीदाराला वाटते की तुमचे लक्ष त्याच्याकडे असावे. जर तुम्ही वारंवार मोबाईल हाताळत असाल तर बॉडी लैंग्वेजने कळते की तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यात इन्ट्रेस्ट नाही. अनेक लोक नजरेला नजर मिळवू शकत नाही कारण ते वारंवार मोबाईल पाहतात ही  वाईट सवय आहे जी तुमच्या रिलेशनशिपला बिघडवू शकते. 
 
4. प्रश्न विचारू नये   
डेटमध्ये तुम्ही प्रश्न विचारावे पण जास्त खाजगी प्रश्न विचारू नये. जोडीदाराची मनस्थिती पाहून प्रश्न विचारावे. यामुळे तुम्ही गोष्टीला पुढे नेऊ शकतात. सोबतच जोडीदाराचा रिप्लाय काळजीपूर्वक ऐकावा मध्येच थांबवू नये. अनेक लोक समोरच्या व्यक्तीचे बोलणे चालू असतांना मध्येच बोलायला लागतात. यामुळे चुकीचा प्रभाव पडतो. 
 
5. योग्य ऑउटफिट घालावे   
तुमचे कपडे तुमचे फर्स्ट इम्प्रैशन असतात. तसे पाहिला गेले तर तुम्हाला जे कपडे आवडतात तेच कपडे घालावे. तसेच इतरांप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न करू नये. साधे, स्वच्छ आणि आपल्या अनुसार चांगले कपडे घालावे. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाण्याची कमी नाही तर, 5 पोषकतत्वांचा अभाव असल्यास फाटतात ओठ