Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

New Year 2022:नवीन वर्षात या चार सवयी सोडा, नातं सुखी होईल

New Year 2022:नवीन वर्षात या चार सवयी सोडा, नातं सुखी होईल
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (13:57 IST)
2021 साल संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 25 डिसेंबरपासून, प्रत्येकजण फक्त पार्टी करण्याच्या आणि नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करण्याच्या मूडमध्ये असेल. त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाची प्रतीक्षा असेल. पण नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेकांनी काही संकल्प निश्चित केले असतात. जेणेकरुन त्यांना येणाऱ्या नवीन वर्षाला मागील वर्षापेक्षा चांगले करता येईल. करिअरप्रमाणेच आपल्याला नात्यातही काही उद्दिष्टे निश्चित करणे महत्त्वाचे आहे. जेणे करून येत्या वर्षात आपण आपल्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगू शकाल. यासाठी काही सवयी सोडणे आवश्यक आहे.आपल्यालाही अशा काही  सवयी असतील तर जुन्या वर्षाप्रमाणे त्या मागेच सोडा. जेणेकरून पुढचे आयुष्य आनंदाने जगता येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार सवयी ज्या कोणत्याही परिस्थितीत सोडल्या पाहिजेत. 
 
1 जोडीदाराकडे दुर्लक्ष करणे -जर आपल्याला अजूनही आपल्या जोडीदाराकडे  दुर्लक्ष करण्याची सवय असेल. तर नवीन वर्षातच त्यात बदल करा. कारण जोडीदारालाही आपल्यास सहवासाची आणि अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
 
2 बोलणे टाळणे - आपल्याला राग येईल म्हणून एखाद्या विषयावर बोलणे टाळल्याने आपल्या नात्यातील कटुता वाढेल.काही गोष्टी मनात ठेवल्याने जोडी दारांमध्ये गैरसमज वाढू लागतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावणे आणि समोरच्या जोडीदाराचे म्हणणे संयमाने ऐकणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून दोघांमध्ये कोणताही गैरसमज होऊ नये. 
 
3 जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल नकारात्मक गोष्टी करणे -जर आपल्याला आपल्या  जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यां बद्दलप्रत्येक गोष्टीत नकारात्मक बोलण्याची सवय असेल. तर ही सवय ताबडतोब बदला. असे सतत केल्याने जोडीदाराच्या मनात आपल्या बद्दल आदराची भावना संपुष्टात येऊ लागते.
 
4 इतरांशी तुलना करणे-  जर आतापर्यंत आपल्याला आपल्या जोडीदाराची इतर लोकांशी तुलना करण्याची सवय असेल. नवीन वर्षाच्या संकल्पात, ही सवय दूर करण्याचा विचार करा. कारण असे केल्याने जोडीदाराच्या मनावर नकारात्मक प्रतिमा तयार होते. जोडीदाराचा नेहमी आदर करा आणि त्याच्या कामाची मोकळ्या पणाने प्रशंसा करा. जेणेकरून ते आयुष्यात चांगले काम करू शकतील. येणाऱ्या नवीन वर्षात या चार सवयी बदलल्याने आपल्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई उच्च न्यायालयाकडून 247 लिपिक पदांसाठी भरती, 6 जानेवारी ही उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख