Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑनलाईन डेटिंग करा पण सावधगिरी बाळगा...

ऑनलाईन डेटिंग करा पण सावधगिरी बाळगा...
, मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (15:58 IST)
आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जगात अनेक सामाजिक परंपरा लोप पावत चालल्या आहेत. ऑनलाइन विवाह संस्कार (मेट्रोमोनी) आणि चॅटींगच्या माध्यामातून नवीन मित्र व जोडीदार शोधण्याचे कार्य केले जाते. हे आता सर्वसामान्यांना सहज माहित आहे. परंतु, या जगात वावरताना केवळ भावनेच्या आहारी जाणे योग्य नाही. त्यासंबंधी सावधगिरी आणि समजूतदारपणा अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही देत असलेल्या खालील काही गोष्टी नेहमी ध्यानात ठेवा. 
 
एखादा व्यक्ती ऑनलाइनवर असल्यास आपल्याला प्रेम पत्र लिहितो. प्रेमाच्या गप्पा मारतो. त्यामुळे तुम्हाला तो आवडू लागतो. परंतु, एक मिनिटानंतर लगेच तो बेजबाबदारपणे ऑफलाइन होऊन 'जावे लागेल नंतर बोलूया' असा संदेश आपल्याला पाठवतो. आणि आपली प्रतिक्रिया जाणून न घेताच संपर्क तोडला जातो.
 
त्यानंतर मात्र आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करत राहतो आणि तो पुन्हा केव्हा ऑनलाइन येईल याची वाट पाहत असतो. आपल्याला हे माहित असते की, हे सर्व कल्पनेच्या बाहेर आहे. तरीही वेब वर्ल्डच्या एका कोपर्‍यात बसलेला तो व्यक्ती तुमच्या मनात काही भावना निर्माण करतो आणि तो हातातही येत नाही. सायबर प्रेमात हे असे घडते. 
 
आपल्याला योग्य जोडीदाराचा शोध घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. अन्यथा आपली फसवणून होण्याची शक्यता असते. 
 
आपण जे पाहत आहात ते खरे आहे का? हे तपासले पाहिजे. आपण जे काही ऑनलाइन पोस्ट करत असतो त्याने चांगल्याबरोबर वाईट लोकही आकर्षित होऊ शकतात. आपण सांगता की मी 23 वर्षाची असून डेटिंग पार्टनर्सच्या शोधात आहे. तेव्हा आपण चांगले मित्र बनविण्याच्या पर्यायाला पूर्णविराम देत असतात. सर्व गोष्टी ‘डेट’ने सुरू होतात आणि डेटवरच संपत नाहीत. नेहमी महान प्रेमकथा मैत्रीमधून सुरू होत असते. आपण प्रेम आणि मित्रांच्या शोधात असाल तर आपला दृष्टिकोन बदला. 
 
 
विविध प्रकारचे लोक आकर्षित झाले पाहिजेत असे आपले प्रोफाइल असावे. परंतु, त्यामुळे वाईट प्रवृत्तीचे लोकही आकर्षित होऊ शकतात. आपण लिहिले की़ मला सलमान रश्दी, डॅन ब्राऊन, जॉन ग्रिशम या लेखकांचे लेखन आवडते तर आपल्याकडे फारसे कोणी फिरकणार नाही. ज्याला त्यांची आवड असतील तेच येतील. आणि हो! कृपया आपला पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक कधीच देऊ नका. तसेच, ई-मेल आयडी देखील जास्त असावे. त्यामुळे आपण आपल्या मर्जीनुसार लॉगआऊट करू शकतो.
 
अयोग्य लोकांच्या त्रासापासून वाचवू इच्छित असाल तर ध्यानात ठेवा. आपल्या विषयी सांगितलेल्या खर्‍या माहितीमुळे चांगल्या प्रकारचे लोक आपल्याकडे आ‍कर्षित होण्याची शक्यता असते. आपण खोटे बोललात तर आपली मैत्री अयोग्य प्रकारच्या लोकांबरोबर होईल, ही या क्षेत्रातील वाईट बाब आहे. योग्य छायाचित्रे आपले अप्रतिम फोटो आपली व्यक्तीगत संपत्ती असते. त्यामुळे त्यांना कुटूंबापुरतेच मर्यादीत ठेवा. या छायाचित्रांचा वेबवर वापर करणे योग्य नाही. याशिवाय आपल्या कौटूंबिक छायाचित्रात दुसर्‍या कुणालाही रस नसतो. 
 
प्रथम चॅटिंग करा. जेव्हा आपण एखाद्या मुलाला ऑनलाइन हाय-हॅलो ने सुरवात कराल. त्यावेळी सुरवातीपासून सावध राहून कॅज्यूअल गप्पा करा. सरळ आणि साध्या संवादामुळे मैत्री विकसित होत असते. प्रथम सुरवात मुलाला करू द्यावी.सरळ साधी फ्लर्टिंग ठीक आहे. परंतु, एखादा मुलगा द्वैयर्थी संदेश पाठवत असेल तर त्याला लगेच ‘बाय बाय करा.’ नाहीतर संकटात सापडाल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या मित्रांचा/डेटिंग पार्टनरचा प्रोफाइल खूपच सावधगिरीने स्कॅन करा. संदेशामागे दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर मुलगा म्हणाला की, आपण चॅटिंग करत असल्याचे दुसर्‍या कुणाला सांगितले नाही तर असे समजावे की, तो आपल्याबाबत खूप काही माहिती लपवत आहे. त्या मुलाच्या संपर्कातून लगेच दूर व्हावे. 
 
ज्या ऑनलाइन मुलांपासून दूर जायला पाहिजे, त्यांच्याविषयी खाली माहिती देत आहोत. 
 
1. ज्या मुलांना आपले सर्व क्लोजअप फोटो आपल्या फ्रोफाइलमध्ये पोस्ट केले आहेत. हा मुलगा आत्मकेंद्रीत असून स्वत: मध्येच मग्न राहील. दुसर्‍यांकडे लक्ष देणार नाही.
 
2. त्याच्या प्रोफाइलमधून काहीही माहिती मिळत नसेल तर जाणून घेण्याचा प्रयत्नदेखील करू नये. तो दुसरीकडे कुठे अडकलेला असू शकतो किंवा त्याच्याकडे कुणासाठी वेळ नसेल. 
 
3. अशा प्रकारच्या मुर्ख लोकांपासून सावध रहा. ज्यांनी आपल्या पत्नीचे फोटो आणि माहिती पोस्ट केली आहे. आणि तरीही ते मैत्रीच्या शोधात आहेत.
 
4. ज्या मुलांना ईमेल आणि चॅटिंग पसंत नाही. परंतु, फोनवर कॉल करण्यास सांगून भेटण्याची तारीख सांगण्यास तयार करणे. या माहितीची योग्य खातरजमा करून घ्यावी.
 
5. प्रेमात धोका पचवलेल्या प्रेमवीरापासूनही सावध रहा. जो कुणी प्रेमाचा कडू अनुभव घेतो तो वेड्यासारखा वागत असतो. अशा प्रकारच्या व्यक्तीपासून दूर राहणेच योग्य. 
 
6. ज्या व्यक्तीचे नकारात्मक विचार आणि तो स्वत: वैतागलेला असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तीबरोबर मैत्री करणे योग्य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेक्ससाठी सर्वात अनुकूल ऋतू