Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाच्या वर्षगाठींच्या पार्टीचे नियोजन करत आहात? या टिप्स अवलंबवा, आनंद द्विगुणित होईल

लग्नाच्या वर्षगाठींच्या पार्टीचे नियोजन करत आहात? या टिप्स अवलंबवा, आनंद द्विगुणित होईल
, शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (22:17 IST)
लग्नाचे बंधन खूप सुंदर असते. ते दोन ह्रदये तर जोडतेच, पण दोन कुटुंबांना एका घट्ट गाठीत बांधते. लग्नाला कितीही वर्षे पूर्ण झाली तरी प्रत्येक वर्ष हे नाते अधिक घट्ट होते. अशा वेळी या नात्याला उत्सव म्हणून साजरे केल्याने या अतूट बंधनात आणखी वाढ होते. व्यस्ततेमुळे आपण आपल्या पार्टनरला स्पेशल फील देऊ शकत नसाल तर या खास दिवशी आपण त्यांच्यासाठी काहीतरी खास करायलाच हवे.
 
लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात घेऊन आपण  पार्टीची योजना आखू शकता. तथापि,बजेट ला लक्षात घेऊन सर्व काही करा. लग्नाच्या वाढदिवस पार्टीची योजना कशी करावी हे जाणून घ्या.
 
1 आपण डेस्टिनेशन पार्टीची योजना आखू शकता. आपल्या लग्नाची वर्षगाठ उन्हाळ्याच्या हंगामात असेल तर आपण एखाद्या हिल स्टेशनवर जाऊन हा सोहळा  साजरा करू शकता. दुसरीकडे, जर आपण समुद्रकिनारा प्रेमी असाल तर समुद्रकिनाऱ्यावर हा आनंदाचा सोहळा साजरा करा. या साठी हवे असल्यास आपण  अशा ठिकाणीही जाऊ शकता जिथे आपल्याला खूप दिवसांपासून जायची इच्छा होती किंवा या साठी आपण नवीन डेस्टिनेशन देखील शोधू शकता.
 
2 ज्याप्रमाणे लग्नासाठी निमंत्रण पत्रिका बनवली जाते, त्याच प्रमाणे आपण  वाढदिवसाच्या पार्टीसाठीही कार्ड बनवू शकता. आपण आपल्या जोडीदारासह स्वतः हे कार्ड डिझाइन करू शकता. आजकाल कार्ड ऑनलाइन देखील डिझाइन केले जाऊ शकतात. यामध्ये आपण आपल्या लग्नाचा किंवा आपला नवीन कपलचा फोटो टाका.  आपण या सोहळ्यासाठी काही खास लोकांना डिजिटल कार्ड पाठवून निमंत्रण देऊ शकता. 
 
3 आपण लग्नाच्या वर्षगाठ पार्टीसाठी कोणतीही थीम देखील ठेवू शकता. जसे की कोणत्या रंगाचे कपडे घालायचे किंवा सजावट कशी ठेवायची.या साठी  रेट्रो, फिल्मी किंवा इतर अनेक मजेदार थीम वापरून पाहू शकता. जर पार्टीची थीम ठेवली असेल, तर त्यानुसार गाण्यांची प्लेलिस्ट बनवू शकता किंवा पार्टीमध्ये वाजवण्यासाठी जोडीदाराच्या आवडीची गाणीही निवडू शकता.
 
4 लोकांच्या आवडीनिवडी आणि आपल्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जेवणाचा मेनू तयार करा. पार्टीत पाहुण्यांसाठी सर्व प्रकारच्या वस्तू ठेवा.
 
5 लग्नाप्रमाणेच लग्नाच्या वाढदिवसा निमित्तही चांगले फोटो काढणारा फोटोग्राफर असणे गरजेचे आहे. तथापि, जर आपण हे करू शकत नसाल तर आपले  मित्र नक्कीच आपल्या या आनंदाच्या सोहळ्याचे चांगले फोटो क्लिक करतील.
 
6 आपण आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या खास फोटोंसह स्लाइड शो किंवा व्हिडिओ तयार करू शकता. व्हिडिओमध्ये,आपण आपल्या आवाजात आपली  भावना, त्या चित्र किंवा व्हिडिओशी निगडीत आठवणी किंवा आपल्या दोघांच्या  नात्यातील सर्वात सुंदर गोष्टीं देखील व्यक्त करू शकता.
 
7 आपण  पाहुण्यांसोबत मजेदार गेम देखील खेळू शकता. यामध्ये कपल्स गेम्सचाही समावेश करता येईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपडी थापडी.. गुळाची पापडी