Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात

love
गुरूवार, 25 मे 2023 (20:57 IST)
तसं तर लग्नानंतर इतर कोणाशी संबंध असणे चुकीचं मानलं गेलं आहे परंतू हा विचार पुरुषांवर पूर्णपणे लागू होत नाही. आपल्याला जाणून हैराणी होऊ शकते पण हे सत्य आहे की विवाहित पुरुष असो वा अविवाहित तरुण त्यांना लग्न झालेल्या स्त्रिया अधिक आकर्षित करतात. अशात आम्ही आपल्याला पुरुषांच्या या आवडीमागील कारण सांगत आहोत- 
 
1. साधारणपणे असे म्हणतात की लग्नानंतर मुलींचा चेहर्‍यावर एक वेगळाच ग्लो असतो. कारण त्या शारीरिकरीत्या सुखी असतात व स्वत:कडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे त्या इतर पुरुष देखील त्यांना बघून आकर्षित होतात.
 
2. लग्नानंतर महिलांच्या शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलमुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व बदलतं, चेहर्‍यावर चमक येते. ज्यामुळे नकळत पुरुष आकर्षित होतात.
 
3. पुरुषांना काळजी घेणार्‍या स्त्रिया आवडतात. पुरुष आम्ही कोणावर अवलंबून नाही असे दाखवत असले तरी त्यांना स्त्रियांनी त्याची काळजी घेतलेली मनापासून आवडते. लग्नानंतर मुली अधिक केयरिंग स्वभावाच्या होतात. 
 
4. लग्न झालेल्या स्त्रियांच्या गोष्टींमध्ये अविवाहित मुलींपेक्षा अधिक समजूतदारपणा दिसून येतो. त्या प्रत्येक गोष्टीवर जबाबदारीने प्रतिसाद देतात तर पुरुषांना नेहमीच मॅच्योर स्त्रिया पसंत असतात. कारण त्या त्रास न देता पुरुषांच्या प्रत्येक समस्येवर योग्य समाधान सांगण्यात सक्षम असतात.
 
5. पुरुषांना एकाच वेळेस अनेक कामे हाताळणे अवघडं जातं अशात ते अशा स्त्रीकडे सजह आकर्षित होतात ज्या घर व बाहेरची कामं सोप्यारीत्या हँडल करतात. 
 
या सर्व कारणांमुळे पुरुषांना लग्न झालेल्या स्त्रिया आवडतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्वचा उजळवण्यासाठी हे करा...