Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

पावसाळ्यात डेटवर जाताना 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

पावसाळ्यात डेटवर जाताना 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
, शुक्रवार, 20 जुलै 2018 (15:59 IST)
पावसाळा हा निसर्गापासून मनुष्यापर्यंत सर्वांनाच नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. या ऋतूमध्ये ज्याप्रमाणे निसर्ग बहरतो, त्याप्राणे मानवी प्रेमसंबंधही फुलताना आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. पावसाळ्यातले रोमॅन्टिक वातावरण सगळ्यांनाच प्रेमाची गोड चाहूल देऊन जाते. पण हा पाऊस कितीही रोमॅन्टिक वाटत असला तरी तो बेभरवशाचा आहे, त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या.
 
कपडे
तुमच्याकडे छत्री किंवा पावसाळी कोट असला तरी तो तुमचे शंभर टक्के संरक्षण करीलच असे नाही. त्यामुळे पावसाळ्यात डेटवर जाताना सुती कपडे घाला, जेणेकरून ते ओले झाले तरी लवकर कोरडे होतील.
 
मेकअप
पावसाळ्यात बाहेर जाताना मेकअपची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण पाण्याने मेकअप खराब झाला तर ऐनवेळी पंचाईत होईल. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात डेटवर जाताना वाटरप्रूफ मेकअप करा.
 
आरोग्य
पावसात भिजण्याचा आनंद प्रत्येकालाच हवाहवासा असतो. मात्र पावसात भिजल्यानंतर तुम्हाला सर्दी, ताप, येणार नाही ना याची काळजी घ्या.
 
स्थळ
पावसाळ्यात डेटवर जाणे म्हणजे एक पर्वणीच असते. अशावेळी चारभिंतीत वेळ घालवण्यापेक्षा मोकळ्या निसर्गात फिरायला कोणालाही आवडतेच. मात्र डेटवर जाण्याअगोदर त्याठिकाणची योग्य माहिती घ्यायला विसरू नका.
 
वाहन
जर दुचाकीवर फिरायला जाणार असाल तर जास्तलांब जाणे धोक्याचे ठरू शकते. कारण रस्ता ओला झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. शिवाय दुचाकी चालवतानाही काळजी घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतातील 89 टक्के कर्मचारी करतात तणावाखाली काम