rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुली नेमके काय करतात ब्रेकअपनंतर ?

what about breakup
मुंबई , शनिवार, 2 जून 2018 (07:54 IST)
जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळ्यासारखे वाटते. एकमेकांपासून दूर राहणे, एकमेकांना विसरणे अवघड होऊन जाते. या सर्वांमधून मुलींना बाहेर पडण्यासाठी अधिक वेळ लागतो. जाणून घ्या ब्रेकअपनंतर मुली नेमके काय करतात.
 
1. सर्वात आधी मुलींना हे जाणून घेण्यास जास्त उत्सुकता असते की ब्रेकअप झाल्यानंतर बॉयफ्रेंडचे इतर कोणाशी अफेअर तर नाही ना?
 
2. मुली मित्रांकडून किंवा सोशल साईट्‍वरून आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे कोणत्या मुलीसोबत अफेअर वगैरे आहे का, याची माहिती मिळवतात.
 
3. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर आपल्या एक्स बॉयफ्रेंडला ब्लॉक करणे आणि पुन्हा अनब्लॉक करणे, हे मुली नियमितपणे करतात. कारण त्यांना हे जाणून घ्यायचे असते की, त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर बॉयफ्रेंड काय काय करतो.
 
4. अनेकदा मुली फोन करुन आपल्या एक्स बॉयफ्रेंडला काही गोष्टी सुनावतात.
 
5. ब्रेकअपनंतर मुली सोशल साईट्सवर सर्वात अधिक अॅक्टीव्ह होतात. याचा उद्देश एकच. आपण आयुष्यात किती खूश आहोत, हे आपल्या एक्स बॉयफ्रेंडला दाखवणे.
 
6. तर काही मुलींना ब्रेकअपनंतर शॉपिंग करणे आवडते. त्यामुळे स्ट्रेस दूर होण्यास मदत होईल.
 
7. काही मुली इतर मुलांसोबत फ्लर्ट करतात. त्यामुळे एक्स बॉयफ्रेंडला जलस फिल होईल आणि तो त्यांच्याकडे परत येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हार्ट अटॅक..???घाबरू नका..