पहिले चुंबन: अविस्मरणीय क्षण
जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक प्रियकराला आपल्या प्रेयसीचा व प्रेयसीला आपल्या प्रियकराचे पहिले चुंबन घेऊन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण नोंदविण्याची इच्छा असते. परंतु, चुंबन कसे घेणार, या भीतीपोटी संधी येऊनही प्रेमीयुगल चुंबन घेण्याचे धाडस करत नाहीत... '
ती' व 'तो' पहिल्यादा एकमेंकांना 'चुंबन' करत असतील त्यांच्यात गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. बोलताना अचानक 'तो' अतिशय गंभीर होऊन जातो आणि तिच्याकडे एक सारखा बघतो. तिला डोळ्यानी चुंबनाचा प्रस्ताव पाठवतो. तीही 'स्मार्ट'. तो डोळ्यांचा इशारा तिला समजते आणि ते दोघे प्रदीर्घ चुंबनात तल्लीन होतात. परंतु, हे अनुभवी जोडप्याला शक्य आहे. पहिल्यांदा तर कमालीचा गोंधळ उडतो. त्यांच्या मनात प्रचंड भिती असते... 'काही होणार नाही ना?' हा तिचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न बहुतेक वेळा पहिल्या चुंबनाला प्रमुख अडसर बनतो. त्यामुळे पहिल्यादा आपल्या जोडीदाराला 'किस' करणे खरंच आव्हानात्मक आहे.सोबत बसून चित्रपट पाहणारे प्रेमी युगल चित्रपटातील चुंबनाचे दृश्य आवर्जुन पाहतात, मात्र ते प्रत्यक्षात साकारायला कचरतात. पहिले चुंबन प्रेमाचा आधार असतो. त्याने प्रेमाला बळ मिळते. दोघांना प्रणयधुंद करणारे पहिले चुंबनच असते. पहिले चुंबन आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रेमी युगलाना काही टिप्स-
केव्हा घ्यावे चुंबन प्रेमी युगलाची भेट संपल्यानंतर ते परस्परांचा निरोप घेतात ही चुंबन घेण्याची खरी वेळ असते. 'गुडबाय' म्हणत प्रियकराला किंवा प्रेयसीला पहिला 'किस' करण्याची सुवर्णसंधी दुसरी असूच शकत नाही. डोळ्यांचे संकेत ओळखा चुंबन घेण्याची सुरवात प्रेयसीकडून कधीच होत नाही, मात्र 'ती' तिच्या प्रियकराला डोळ्यांनी चुंबनाचा संकेत द्यायला विसरत नाही. त्यामुळे प्रेयसीच्या डोळ्यांतील छुपे संकेत प्रियकराने वेळीच ओळखले पाहिजेत. प्रेयसी तुम्हाला अगदी चिकटून बसत असेल, वारंवार तुमचा हात दाबत असेल किंवा तुमच्या केसाशी खेळत असेल तर तिला तुमच्याकडून प्रदीर्घ चुंबनाची अपेक्षा आहे, हे ओळखा.
पहिले चुंबन कसे असावे पहिले चुंबन आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण करायचा असल्याने चुंबनात हळूवारपणा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचे प्रेम द्विगुणीत होत असते. पहिल्या चुंबनात शरीराशी खेळता कामा नये. कारण त्यातून तुमच्या जोडीदाराला चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या व्यतिरिक्त बंद डोळे, जिभेचा स्पर्श न करता चुंबन घेत असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराची खूप काळजी घेतात, हा संदेश जातो. पहिले चुंबन प्रदीर्घ असावे पहिले चुंबन प्रदीर्घ असावे, त्याच्यासाठी आधीच कुठलीच मर्यादा आखून ठेवायला नको. जेव्हा तुमचे ओठ तुमच्या प्रेयसीच्या नाजूक ओठांचा स्पर्श करतील, त्याच्या काही क्षणानंतर हळूच ओठ वेगळे करावे. जोडीदार व तुमच्यात शेवटपर्यंत समन्वय असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे चुंबन घेण्याचे एक विशिष्ट प्रकारची स्टाइल असते. ही 'स्टाइल' प्रियकराने वेळीच उपयोगात आणली तर पहिले चुंबन अधिक रोमॅटिक होईल. मग पहिले चुंबन घेतले नसेल तर वेळ कशाला वाया घालवता. चला तर मग ! लागा तयारीला पहिल्या चुंबनाच्या.....