कोणतं ही नातं विश्वासावर टिकलेलं असतं. पती-पत्नीच्या नात्याचा ही आधार विश्वासचं असतो. मात्र, काही गोष्टी अशा घडतात की बायको नवर्यावर शंका घेऊ लागते आणि मग सुरू होतात भांडणं. बायकोचे शंका घेण्याचे मुख्य कारणे:
* मोबाइलमध्ये डोके खुपसणे:
नवर्याने मोबाइलवर म्हणजे व्हॉट्स अँपवर किंवा इतर चॅटिंग अँपवर अधिक वेळ घालवल्याने बायकोच्या मनात शंका निर्माण होते. सध्याच्या काळात भांडणाचं सर्वात मोठे कारण मोबाइलचं आहे.
* ऑफिसातून उशिरा घरी येणे:
ऑफिसातून काम संपल्यानंतरही वेळेत घरी न येणारे पुरुष बायकोच्या शंकेचे बळी ठरतात. त्यातून फोन केल्यावर रस्त्यात आहे म्हणूनही लवकर घरी न येण्यार्या नवर्याची तर क्लासचं लागते.
* ऑफिशिअल टूर:
ऑफिशिअल टूरला जाण्याचं नाव काढलं की बायकोच्या मनात शंका निर्माण होते आणि कित्येकदा तीही सोबत येण्याचा आग्रह करते.
* बायकोची अतिकाळजी घेणं:
बायकोशी प्रमाणापेक्षा जास्त चांगला व्यवहार केल्यावर किंवा तिची अधिक काळजी करण्यामुळेही बायको शंका घेऊ लागते.
* तयार होऊन बाहेर जाणे:
जर नवरा नटून म्हणजे नवीन कपडे घालून, बूट पॉलिश करून, परफ्यूम लावून घराबाहेर पडत असेल तेव्हाही बायकोच्या शंकेत भर पडते.