माध्यमिक शिक्षण संपलं कि लगेचच वेड लागतं ते कॉलेजचं. म्हणजेच आपण अनंक संभाषणातून ऐकतो, गधडे तू काय आता लहान आहेस? आता कॉलेजला जाते ना? म्हणजेच आईवडिलांनासुद्धा आनंद वाटतो कि आपली मुलगी आता कॉलेजला जात आहे.
शाळेची वर्षे संपताच मुलगी मोठी होते. खरचं हे वयच वेडं असतं तेच मुलींना अवखळ बनवितं. माध्यमिक शिक्षण संपलं कि मुलामुलींना वेड असतं. ते म्हणजे कॉलेजमध्ये जाण्याचं. ओढ लागते कॉलेज विश्वाची आपण प्रत्येकजण कॉलेज म्हणतो पण कॉलेज म्हणजे नेमकं काय? तर कॉलेज म्हणजे तरुणाईचं मुक्त प्रांगण स्वतंत्र व्यासपीठ जेथे कुठल्याही कोणत्याही गोष्टीची सक्ती नाही. जिथे मनमुरादपणे तुम्ही तिचा आनंद घेऊ शकता फुलपाखराप्रमाणे बागडू शकता. या वयात मुली एका स्वप्नमय दुनियेत रंगतात. कल्पनेत वागतात. पण मुलींनो सावधान! तुम्ही आताच एका नव्या जगात प्रवेश करीत आहात. या नव्या जगात चालण्यासाठी बागडण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला भरपूर स्वातंत्र्य दिलयं म्हणजे त्याचे स्वैराचारात रुपांत होऊ देऊ नका.
WD
या कॉलेजलाईफमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला एक चमचमती गाडी असावी. चांगल्या ब्रँडचे कपडे असावेत. गॉगल्स, शूज, चप्पल आणि आकर्षित छानशी हेअरस्टाइल. एकंदरीत कॉलेजमध्ये आपली पर्सनॅलिटी अकॉमन असावी. पण मुलींनो सिनेमामधलं कॉलेज आणि खरंखुरं कालेज यामध्ये जमिन आसमानचा फरक आहे. हे लक्षात घ्यायला हवे. कॉलेजमध्ये वावरताना आपण आपल्या वेशभुषा, केशभुषा याकडे लक्ष द्यावे. आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असाच पेहराव करावा. भडक टवटवीत मेक-अप टाळावा. अंगप्रदर्शन करणारे कपडे टाळावेत.
मोठमोठ्याने हसणे, बोलणे, टाळावे. एकंदरीत कॉलेज म्हणजे फुल टाइमपास करण्याची जागा नाही. तर जीवनाला कलाटणी देणारा एक अनुभवविश्व ठरतो. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले जातात. ते कॉलेजमध्येच तेव्हा मुलींनी आपल्या व्यक्तिमत्त्वात लपलेल्या प्रतिमेला ओळखून पुढे न्यावे. आपल्या आशा, आकांक्षा, दिपस्तंभरूपी कॉलेजमध्येच निर्माण होतात त्यांना वाव घ्यावा.