Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

नवरा होणे सोपे नाही

husband wife jokes
नवरा बायकोच्या आयुष्यातील मजेशीर किस्सा 
 
सकाळी एका पतीने आपल्या पत्नीला उठवलं.....
नवरा :- चल उठ.. आपण योगा क्लास ला जावूया... 
बायको :- का हो.. मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय..?
नवरा :- तसं नाही गं.. योगा हे निरोगी राहण्यासाठी... आपल्या फिटनेस साठी छान असतं..
बायको :- म्हणजे मी अनफिट आहे... आजारी आहे.. असं म्हणायचंय तुम्हाला..
नवरा :- जावू दे.. नसेल उठायचं तर...
बायको :- याचा अर्थ काय.? तुम्ही मला आळशी समजता की काय..?
नवरा :- हे बघ, तुझा गैरसमज होतोय..
बायको :- अरे देवा.. म्हणजे मला अक्कलच नाही.. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला.. 
आणि तुम्हीं म्हणताय मी तुम्हाला समजूं शकले नाही... माझा गैरसमज होतोय..
नवरा :- अगं मी तसं म्हणालो काय..?
बायको :- म्हणजे.... मी खोटं बोलत आहे तर..
नवरा :- ओके ओके... जाऊ दे..सकाळी सकाळी वाद कशाला..
बायको :- मी वाद घालते ?  मी वाद घालते.. ? तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे...?
नवरा :- ठीक आहे... मी ही जात नाही फिरायला... योगा कैन्सल..
बायको :- बघितलंत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं.. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं...
नवरा :- बरंय.. मी एकटाच जातो.. तू झोप आनंदात... 
बायको :- जा जा.. एकटेच जा.. तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता..  कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही... 
नवरा :- आता माझं डोकं गरगरतंय... चक्कर येतेय मला...
बायको :- येणारच... स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी स्वत:पुरताच विचार करता नां..!  बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला...! चक्कर येणारच..!
नवरा मौन..
नवरा (मनाशीच) च्यायला माझं चुकलं कुठे....??

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'साहो'चे सॅटेलाईट राइट्स ३२० कोटींना विकले