विन्या प्रधान कधी नव्हे ते बायकोला घेऊन हॉटेलात गेला. त्याला पहाताच एक नखरेल छम्मकछल्लो ठुमकत त्याच्यापाशी आली आणि ‘हाय विनू डार्लिंग’ म्हणत त्याला ‘सविस्तर’ मिठी मारून; गालवर अलगद ओठ टेकवून निघून गेली.
ती जाताच फणका-याने विन्याची बायको धुसफुसली. “कोण होती ती बया ?”
विन्या वैतागून म्हणाला, आता तू उगाच मला ताप देऊ नकोस बरं ! तीही हाच प्रश्न विचारेल, ह्या विचाराने मी आधीच त्रासलोय !!